पुणे: शाळेतील बाऊन्सर्सकडून पालकांना मारहाण, संतप्त पालकांची पोलीसात धाव (Video)

Updated On:
पुणे: शाळेतील बाऊन्सर्सकडून पालकांना मारहाण, संतप्त पालकांची पोलीसात धाव (Video)

पुणे – शाळेची लॅब फी नाकारायला गेलेल्या पालकाला शाळेतील बाऊंन्सरकडून मारहाण झाली. ही घटना बिबवेवाडी येथील क्लाईन मेमोरीअल हायस्कूलमध्ये घडली. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात पालकांच्यावतीने तक्रार दाखल करण्याचे काम सुरु आहे.

याप्रकरणी मंगेश गायकवाड फिर्याद देत आहेत. त्यांना महिला बाऊंन्सरकडून मारहाण झाली. याप्रकरणाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर संतप्त पालकांनी एकत्र येऊन बिबवेवाडी पोलीस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान या प्रकरणी शाळेकडू अद्याप कोणतीही प्रतिक्रीया आली नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, मंगेश यांचा मुलगा क्‍लाएंट मेमोरीअल हायस्कूमध्ये शिक्षण घेत आहे. मागील दोन वर्षापासून करोनामुळे शाळा ऑनलाईन होत आहे. मात्र तरीही लॅब आणि लायब्ररीची फी शाळेकडून घेण्यात येत आहे. तसेच शाळेची फी ही वाढवण्यात आली आहे. यामुळे पालकांनी दोन दिवसांपुर्वी मुख्यध्यापकांची भेट घेतली होती. मात्र ही भेट समाधानकारक झाली नाही, शाळा फी कमी करण्यास तयार नव्हती.

यानंतर पुन्हा एकदा मंगेश गायकवाड आणि इतर पालक मुख्यध्यापकांना भेटण्यासाठी शाळेत गेले होते. मात्र शाळेच्या बाऊंन्सरनी त्यांना भेट घेऊ दिली नाही. यामध्ये बाऊंन्सर आणि पालकांमध्ये वादावादी झाली. यातच एका महिला बाऊंन्सरने मंगेश गायकवाड यांना धक्काबुक्की केली.

यासंदर्भात माहिती देताना भारतीय युवा मोर्चाचे सरचिटणीस प्रतिक देसरडा यांनी सांगितले, मागील दोन वर्षात करोनामुळे अनेक लोक बेरोजगार झाले आहेत. पालकांकडे फी भरायला पैसे नाहीत. अशातच शाळेने फी वाढवली आहे. याला विरोध करण्यासाठी पालक गेले असता ही घटना घडली. मुळातच शाळेमध्ये बाऊंन्सर ठेवणे अयोग्यच आहे.

आणखी संबंधित बातम्या

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

2026-10-09 07:53:50

Diwali Vacation: विद्यार्थ्यांची १९ दिवस दिवाळी

MPSC Protest: पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

2026-10-09 07:39:26

MPSC Protest:  पुलावरील ठिय्या तात्काळ उठविण्याचे आदेश

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

2026-10-09 07:32:38

PMPML: नवरात्रोत्सवात देवींच्या शक्तीपीठांसाठी विशेष बससेवा

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

2026-10-09 07:30:11

Pune Municipal Corporation: झाडणकाम निविदा ; रस्त्यांच्या आकडेवारीची होणार सफाई

MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम

2026-10-09 07:24:50

MPSC Protest: आंदोलनावर सुरूच ठेवण्यावर एमपीएससी विद्यार्थी ठाम