Pune: एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर हल्ल्याचा प्रयत्न
Updated On:

पुणे – एकतर्फी प्रेमातून अल्पवयीन मुलीवर गुंडाने कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तसेच तिच्या मैत्रिणीला मारहाण केल्याची घटना फुरसुंगी परिसरात घडली.
या प्रकरणी आशिष मारुती दणके (वय 24, रा. फुरसुंगी) याच्या विरोधात गुन्ह दाखल झाला आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने हडपसर पोलीसांत फिर्याद दिली आहे. आरोपी तक्रारदार मुलीचा पाठलाग करत होता. त्याने तिला प्रेमाची गळ घातली होती. तो विवाहित असून, मुलीने याबाबतची माहिती त्याच्या पत्नीला दिली. त्यामुळे तो तिच्यावर चिडला होता.
मुलगी फुरसुंगी भागातून निघाली असता दणकेने तिच्यावर कोयत्याने हल्ला चढविला. प्रसंगावधान राखून मुलीने वार हुकवला. यानंतर तिच्याबरोबर असलेल्या मैत्रिणीला मारहाण करुन दणके पसार झाला.





