Pune : अकरावी पहिल्या फेरीनंतर तब्बल १६ लाख जागा रिक्त
Updated On:

पुणे – अकरावी ऑनलाईन प्रवेशांच्या पहिल्या फेरीनंतर १६ लाख १५ हजार ८४० जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीत ५ लाख ७ हजार ८८० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. अकरावी कॅप फेरीसाठी १६ लाख ७० हजार ५९८ तर कोटा प्रवेशासाठी ४ लाख ५३ हजार १२२ इतक्या जागा आहेत. त्यासाठी १३ लाख ८३ हजार ७६१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
कॅपअंतर्गत ४ लाख ३२ हजार ८४ प्रवेश झाले असून १२ लाख ३८ हजार ५१४ प्रवेशाच्या जागा रिक्त आहे. अल्पसंख्यांक, इन-हाऊस, व्यवस्थापन कोटांतर्गत ७५ हजार ७९६ प्रवेश झाले असून कोटांतर्गत ३ लाख ७७ हजार ३२६ जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीत प्रवेश मिळूनही १ लाख २४ हजार ३१४ विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतलेला नाही.





