pune : लेफ्टनंट कर्नल प्रेम प्रकाश तलवार यांना शतकपूर्तीनिमित्त लष्कराचा सलाम
pune :

pune : तोफखाना दलाचे (रेजिमेंट ऑफ आर्टिलरी) निवृत्त अधिकारी लेफ्टनंट कर्नल प्रेम प्रकाश तलवार यांनी २४ जुलै २०२६ रोजी आपला १०० वा वाढदिवस साजरा केला. देशाच्या सेवेसाठी समर्पित असलेल्या त्यांच्या आयुष्यातील हा एक अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पा ठरला.
मे १९५० मध्ये तोफखाना दलात नियुक्त (कमिशन) झालेले लेफ्टनंट कर्नल तलवार यांनी मे १९७७ मध्ये निवृत्त होण्यापूर्वी २७ वर्षांहून अधिक काळ उत्कृष्ट सेवा बजावली. त्यांच्या गौरवशाली लष्करी कारकिर्दीत त्यांनी १९६५ आणि १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता.
अग्निबाज डिव्हिजनच्या अधिकारी, ज्युनियर कमिशन्ड अधिकारी आणि इतर रँकच्या जवानांच्या एका शिष्टमंडळाने, डायरेक्टर जनरल, रेजिमेंट ऑफ आर्टिलरी आणि संपूर्ण तोफखाना दलाने त्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.
कुटुंबातील सदस्य आणि सहकारी माजी सैनिकांबरोबरच, सेवेतील अधिकारी आणि इतर रँकच्या जवानांनीही या सोहळ्यात सहभाग घेतला. लेफ्टनंट कर्नल तलवार यांना एक स्मृतिचिन्ह भेट देण्यात आले. याशिवाय माजी सैनिक आणि सेवेतील गनर्सनी त्यांच्या समर्पित सेवेच्या काळातील आठवणींना उजाळा दिला.





