ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयात गर्दी मुंढवा – पुणे महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ अंतर्गत प्रभाग क्र. १३ आणि प्रभाग क्र. १४ साठी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ही मतदान केंद्रे निश्चित झाली आहेत. यानुसार प्रभागातील उमेदवारांनी आपले अर्ज सोमवारी आणि मंगळवारी येथे दाखल केले. अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी दुपारी अनेक इच्छुक उमेदवारांना टोकण दिले होते त्यामुळे अर्ज स्विकारल्यानंतर त्याची पडताळणी रात्री उशीरापर्यंत सुरू होती, यामुळे एकुण किती अर्ज स्विकारले गेले याच निश्चीत आकडेवारी समजू शकली नाही, बुधवारी ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत खरात यांच्याकडून अंतिम आकडेवारी सांगण्यात येईल. आज अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी प्रभाग क्र.१४ मधून भाजपातर्फे ब गटातून किशोर धायरकर, प्रभाग क्र.१४ मधून भाजपातर्फे ड गटातून उमेश गायकवाड तर प्रभाग क्र.१४ मधील राष्ट्रवादी कॉंंग्रेस अजित पवार पक्षातर्फे अ गटातून सुमन उर्फ गया सोमनाथ गायकवाड, ब गटातून संदीप कोद्रे, क गटातून सुरेखा कवडे, ड गटातून बंडू गायकवाड यांनी ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी या उमेदवारांनी आपण विजयी होऊ असा विश्वास व्यक्त केला.