Crime News: पुणे अंमली पदार्थ विरोधी पथकाचा गांजा तस्करांवर ‘प्रहार’
शिरूरमध्ये दीड कोटींचा मुद्देमालासह दोघे केले 'गजाआड'

पुणे शहर गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने शिरूर शहरामध्ये मोठी धडक कारवाई करत तब्बल २५० किलो गांजा आणि एक आलिशान कार असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत अमरावती जिल्ह्यातील दोन सराईत तस्करांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे शहराचे पोलीस आयुक्त यांनी अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री आणि वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी पथक-२ चे पोलीस निरीक्षक जीवन माने आणि त्यांचे पथक गस्तीवर असताना, शिरूरमधील स्टेट बँक कॉलनी परिसरात दत्त मंदिराजवळील सत्यभामा निवास इमारतीसमोरील मोकळ्या जागेत काहीजण अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली.
पोलिसांनी तात्काळ सापळा रचून या ठिकाणी छापा टाकला. यावेळी दोन तरुण संशयास्पदरीत्या आढळून आले. त्यांची व त्यांच्याकडील वाहनाची झडती घेतली असता, तब्बल १ कोटी २५ लाख रुपये किमतीचा २५० किलो गांजा आढळून आला.
पोलिसांनी हा गांजा, गुन्ह्यात वापरलेली २५ लाख रुपये किमतीची ‘महिंद्रा XUV 700’ कार आणि १ लाख २० हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल (सॅमसंग व ओप्पो) असा एकूण १ कोटी ५१ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
अटक करण्यात आलेल्या आरोपीं समीर पुरुषोत्तम राऊत (वय २४, व्यवसाय – पेव्हर ब्लॉक ऑपरेटर, रा. सांगोळवाडा, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती), अजय जगदीश मोहिते (वय ३०, व्यवसाय – फर्निचर काम, रा. बागापूर, ता. चांदूर रेल्वे, जि. अमरावती) अशी नावे आहेत.
‘पुणे शहर आणि परिसरात अंमली पदार्थांची तस्करी किंवा विक्री करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. नशेच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी आमची ‘झिरो टॉलरन्स’ मोहीम यापुढेही अधिक तीव्रतेने सुरू राहील. या रॅकेटच्या मुळाशी जाऊन मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई केली जाईल.अंमली पदार्थ विरोधी पथक-२ ने केलेली ही कारवाई अत्यंत कौतुकास्पद आहे. पुणे पोलिसांची ही धडक मोहीम अशीच सुरू राहील.’ – अमितेश कुमार, पोलीस आयुक्त, पुणे शहर
मात्र शिरूर पोलीस नक्की काय काम करतात हा प्रश्न नागरिकांना पडला असून शिरूर शहरात एवढा मोठा गांजा सापडत आहे व शिरूर पोलिसांना याचा थंग पत्ताही लागत नाही ही अतिशय गंभीर बाब मानली जात आहे.
Yugendra Pawar: ‘अजितदादांनंतर बारामतीला वाली उरला आहे का?’ युगेंद्र पवारांचा पोलिसांना थेट सवाल





