Pune : स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपीला समक्ष भेटण्यास परवानगी द्या; आरोपीच्या वकिलाचा न्यायालयात अर्ज

पुणे – स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय रामदास गाडे याला समक्ष भेटण्यास परवानगी द्यावी, असा अर्ज त्याचे वकील अॅड. वाजेद खान (बिडकर) यांनी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांकडे दाखल केला आहे. यावर सोमवारी (दि.२४) सुनावणी होणार आहे.
परगावी निघालेल्या तरुणीला धमकावून शिवशाही बसमध्ये बलात्कार केल्याची घटना स्वारगेट एसटी स्थानकाच्या आवारात घडली होती. या प्रकारामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी गाडे याला अटक केली आहे. तो न्यायालयीन कोठडीत येरवडा कारागृहात आहे. तेथे वकिलाला इतर आरोपींप्रमाणे त्याच्याशी फोनवरूनच बोलावे लागते.
मात्र, हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. घटनेचे मीडियामध्ये उमटलेले पडसाद, फोनवर बोलताना इतर आरोपी, पोलीस उपस्थित असतात. त्यामुळे तो मानसिक विवेचनातून जात आहे. त्यामुळे त्याला प्रत्यक्ष भेटून मुलाखत घेण्यास परवानगी देण्याची मागणी, अॅड. वाजेद खान (बिडकर) यांनी अर्जातून केली आहे.





