पुणे : ग्लोबल ग्रुप आणि क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने ससून मधील सोफोश आणि श्रीवत्स संस्थेस 100 खुर्च्या आणि स्वयंपाकघरात उपयोगी पडणारे साहित्य भेट देण्यात आले.
यावेळी भाजप चे नवनिर्वाचित शहर अध्यक्ष धीरज घाटे, ग्लोबल ग्रुप चे चेयरमन संजीव अरोरा, क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर, माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, व्यापारी महासंघाचे उपाध्यक्ष पप्पूशेठ कोठारी,भाजप युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर, दीपक पोटे, प्रदेश युवा मोर्चा सरचिटणीस सुशील मेंगडे,ओबीसी आघाडीचे सतीश गायकवाड,कुलदीप सावळेकर, सुभाष जंगले, विकास लवटे उपस्थित होते.
क्रिएटिव्ह फाउंडेशन च्या वतीने पुण्यात विविध संस्थांना मदत करून सेवाकार्याने फडणवीस यांचा वाढदिवस साजरा करण्यात येतं असल्याचे क्रिएटिव्ह फाउंडेशन चे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी सांगितले.