Pune Accident | मार्केट यार्डमध्ये दुर्दैवी अपघात ; भरधाव वाहनाने घेतला महिला दुचाकीस्वाराचा जीव

प्रभात वृत्तसेवा
पुणे – भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला असून वाहनचालकाविरुद्ध मार्केट यार्ड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.अनिता गणेश दळवी (वय ३३, रा. श्रेयस सदन, आंबेगाव बुद्रुक, कात्रज) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोहम्मद साजिद खान (वय ५५, रा. हयात सोसायटी, न्यू एरा सोसायटी, बिबवेवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. याबाबत गणेश नारायणराव दळवी (वय ४०) यांनी मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
दुचाकीस्वार अनिता दळवी सोमवारी (२२ सप्टेंबर) या सकाळी मार्केट यार्ड भागातून निघाल्या होत्या. त्यावेळी कांचनगंगा सोसायटीजवळ भरधाव वाहनाने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार अनिता गंभीर जखमी झाल्या. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. सहायक निरीक्षक अश्विनी पाटील तपास करत आहेत.





