Pune Accident News : जांभुळवाडी दरी पुलावर भीषण अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली
Pune Accident News : जांभुळवाडी दरी पुलावर रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास 3 ते 4 वाहनांचा भीषण अपघात झाला.

Pune Accident News : नवले पूल परिसरात सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकेत आणखी एक घटना शनिवारी रात्री उशिरा घडली. जांभुळवाडी दरी पुलावर रात्री सुमारे पावणे बाराच्या सुमारास 3 ते 4 वाहनांचा भीषण अपघात झाला.
या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
प्राथमिक माहितीनुसार, या अपघातात तीन जण किरकोळ जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
अपघाताची तीव्रता लक्षात घेता मोठी दुर्घटना होण्याची शक्यता होती; मात्र रात्रीच्या वेळी वाहतूक कमी असल्याने मोठा अनर्थ टळला.
अपघातानंतर रस्त्यावर वाहनांच्या काचांचा मोठ्या प्रमाणात खच पडला होता. घटनास्थळी पोलिसांनी तात्काळ धाव घेत मदतकार्य सुरू केले. अपघातग्रस्त वाहने बाजूला काढून वाहतूक सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.
दरम्यान, नवले पूल व परिसरात वारंवार होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.
हेही वाचा:
Accidents : ओल्या कचऱ्याच्या लिचेटने अपघात वाढले; कचऱ्याचे पाणी रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांची कसरत






