Pune : ‘प्रभाग 26’मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची बाईक रॅली

पुणे – पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 घोरपडे पेठ, गुरुवार पेठ व समता भूमी परिसरात बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
पक्षाचे चारही अधिकृत उमेदवार विजय ढेरे, सीमा काची, गणेश कल्याणकर, रुपाली ठोंबरे यांनी रॅलीचे नेतृत्व केले. या बाइक रॅलीत मोठ्या संख्येने युवक, पदाधिकारी, महिला कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी कार्यकर्त्यांनी परिसर राष्ट्रवादी काँग्रेसच्या झेंड्यांनी आणि घोषणांनी दणाणून गेला.
रॅलीच्या सुरुवातीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पुणे शहरासाठी केलेल्या विकासकामांचा, लोकहिताच्या धोरणांचा आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी घेतलेल्या भूमिकेचा उल्लेख करण्यात आला.
रॅलीतील तरुणांचा सहभाग पाहता, युवकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल व विकासाच्या दृष्टिकोनाबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचा आशावाद यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीत या प्रभागातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठे यश मिळणार, असा विश्वास कार्यकर्ते व नागरिकांनी व्यक्त केला.





