Pune: हरवलेले 41 मोबाईल तक्रारदारांच्या ताब्यात; शिवाजीनगर पोलिसांचे यश

पुणे – भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या सायबर पथकाने तब्बल ५ लाख रुपये किंमतीचे हरवलेले ४१ मोबाईल फोन शोधून तक्रारदारांना परत केले. या कारवाईबद्दल तक्रारदारांनी पोलिसांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश बोळकोटगी यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि संतोष पाटील, पोलीस अंमलदार तेजस चोपडे व आदेश चलवादी यांनी ही कारवाई केली. हरवलेल्या मोबाईलचा डेटा तयार करून तांत्रिक तपास करण्यात आला. तपासादरम्यान हे मोबाईल महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत तसेच इतर राज्यांत वापरले जात असल्याचे आढळून आले. स्थानिक पोलिस ठाण्यांच्या मदतीने सर्व मोबाईल हस्तगत करण्यात आले.
हस्तगत करण्यात आलेले मोबाईल परिमंडळ १ चे पोलिस उपआयुक्त कृषीकेश रावले व सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या हस्ते तक्रारदारांना परत करण्यात आले. मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदारांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला.
मोबाईल हरवल्यास तक्रारदारांनी punepolice.gov.in/LostFoundReg या वेबसाईटवर नोंदणी करावी व त्याची प्रत जवळच्या पोलिस ठाण्यात द्यावी. तसेच CEIR पोर्टल (www.ceir.gov.in) वर मोबाईलची नोंद करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
ही कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त राजेश बनसोडे, पोलिस उपआयुक्त कृषीकेश रावले, सहायक पोलिस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वपोनि महेश बोळकोटगी, पोनि (गुन्हे) धनंजय पिंगळे, सपोनि संतोष पाटील, मपोउप मनीषा वलये, मपांहदा नलिनी क्षीरसागर, पोशि आदेश चलवादी, पोशि तेजस चोपडे, पोशि नवनाथ आटोळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.





