पुणे : पीएमपीच्या ताफ्यात 100 बसेस दाखल

पुणे- पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या संचलनात आणखी 100 ई-बसेस दाखल होणार आहेत. या बसेसचे लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.
पीएमपीकडून ई-बसेसची खरेदी करण्यात येत आहे. सध्या पीएमपीच्या ताफ्यात 150 बसेस आहेत. तर आता मार्च महिन्यात आणखी 100 बसेसमध्ये वाढणार आहे. त्यापैकी पुण्यात दाखल झालेल्या सुमारे 90 हून अधिक बसेसची नोंदणी प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे. यापूर्वीच्या बसेसचे लोकार्पण देखील 2019 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. त्यापाठोपाठ आता पुन्हा 100 नवीन बसेसचे लोकार्पण मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. मार्च महिन्यात मोदी पुणे दौऱ्यावर आहेत. याचवेळी बसेसचे देखील लोकार्पण करणे नियोजित असून, याला महापौर मुरलीधर मोहोळ यांनी देखील दुजोरा दिला आहे. मार्च महिन्यात ताफ्यात नवीन 100 ई-बसेस दाखल होणार आहेत.





