Nagar | राज्य सरकारचा स्वराज्य पक्षाच्यावतीने जाहीर निषेध

संगमनेर, (प्रतिनिधी) – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावर अतिक्रमण होत असताना सरकार बघ्याची भूमिका घेत होते. मात्र, काही दिवसांपूर्वी स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांनी हे अनधिकृत अतिक्रमण तत्काळ काढा, असे सरकारला कळवले.
त्याकडे कानाडोळा करत ही मागणी फेटाळली. जेव्हा स्वराज्य प्रमुख छत्रपती संभाजीराजे यांच्या नेतृत्वात लाखो शिवभक्त विशाल गडावर पोहचले. तिथे जो काही प्रकार घडला, त्यात शिवभक्तांची काही चूक नसताना शिव भक्तांवर खोटे गुन्हे दाखल केले. त्यात छत्रपती संभाजीराजे यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला.
त्यानिषेधार्थ संगमनेर शहर येथे स्वराज्य पक्षाच्या वतीने आशिष कानवडे यांच्या मार्गदर्शनाखाली व नीलेश भाऊ पवार यांच्या नेतृत्वात निषेध नोंदवण्यात आला. शहर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन शिवभक्तांवरील गुन्हे मागे न घेतल्यास आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी आकाश शिंदे, जयराज दुशिंग, ओंकार अभंग, आदित्य बडे, आकाश टिपरे, शमुवेल थोरात, गुरुदास सहाने व विद्यार्थी संघटनांसह कार्यकर्ते उपस्थित होते.





