Satara News : एमआयडीसी रस्त्यावर सांडपाण्याचा प्रश्न गंभीर; नागरिकांचा संयम सुटला, आंदोलनाचा इशारा
Satara News : बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते एमआयडीसी रस्त्यावर सांडपाण्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य; त्रिशंकू भागाच्या वादात नागरी सुविधांचा बोजवारा.

Satara News – बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते एमआयडीसी या रस्त्यावरील सांडपाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत. हा भाग त्रिशंकू असल्यामुळे या भागामध्ये नागरी सुविधांची आबाळ होत असून जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रशासन या सुविधांबाबतीत गांभीर्याने घेत नाही. या भागामध्ये नटराज मंदिर, सरकारी बँक, जात पडताळणी कार्यालय तसेच मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीचा भाग असून येथील मुख्य रस्त्यावर बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील अपार्टमेंटमधील सांडपाणी कायम या रस्त्यावर आल्यामुळे दुर्गंधी पसरलेली असते.
नागरिकांना या सांडपाण्यातून वाट काढावी लागते. येथील नागरिकांनी अनेक वेळा समज देऊन सुद्धा हा ड्रेनेज प्रश्न मार्गी लागला नसल्याने जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, दारूबंदी खाते, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देणार असल्याचे नागरिकांनी सांगितले याठिकाणी रस्त्याच्या कामामुळे गेले दहा दिवस रस्ता बंद असून व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याबाबत नागरिकांनी अनेक वेळा संबंधित व्यापारी संकुलातील गाळे मालकांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी याबाबतची जबाबदारी झटकली असल्याचे सांगितले. तसेच या ठिकाणी रस्त्यावरून जाणाऱ्या पुरुष व महिला पादचाऱ्यांना मद्यपींचा त्रास सहन करावा लागतो, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले
‘ना घर का ना घाट का’
हा त्रिशंकू भाग खेड ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट करावा या मागणीसाठी दि. 30 जून रोजी विशेष ग्रामसभा घेण्यात आली होता. त्याचा प्रस्ताव खेड ग्रामपंचायतीने शासनाकडे पाठवला असून अद्याप शासनाकडून कोणतीच ठोस पावली उचलली गेली नाहीत. नागरिक संभ्रमावस्थेत असून त्यांची अवस्था ‘ना घर का ना घाट का’ कशी झाली आहे





