Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराजांच्या मुलीचा शाही विवाह; ‘या’ दिग्गजांनी लावली हजेरी, पहा संपूर्ण यादी
Indorikar Maharaj : निवृत्ती महाराज इंदोरीकर यांची कन्या ज्ञानेश्वरी यांचा विवाह उद्योजक साहिल चिलप यांच्याशी संपन्न झाला.

Indorikar Maharaj : संगमनेरमध्ये आज प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा भव्य विवाहसोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला आहे. निवृत्ती महाराज देशमुख यांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख हिचा विवाह उद्योजक साहिल चिलप यांच्याशी झाला. याआधी त्यांचा साखरपुडा देखील प्रचंड चर्चेत राहिला होता. (Indorikar Maharaj)
हा विवाहसोहळा तब्बल १०० एकर परिसरात आयोजित करण्यात आला असून, त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. या सोहळ्याला राजकीय, सामाजिक आणि अध्यात्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली. (Indorikar Maharaj)
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मंत्री छगन भुजबळ, विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे, खासदार राजन विचारे, राजाभाऊ वाझे, भाऊसाहेब वाकचौरे, आमदार श्वेता महाले, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, किरण लहामटे, सत्यजित तांबे, विवेक कोल्हे, शरद सोनवणे, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील तसेच जयश्री थोरात आदी दिग्गजांनी या विवाहसोहळ्यास हजेरी लावली. (Indorikar Maharaj)
कोण आहेत इंदोरीकर महाराजांचे जावई?
ज्ञानेश्वरी देशमुख यांचे पती साहिल चिलप हे प्रसिद्ध उद्योजक असून, ते उद्योगपती सुनील चिलप यांचे सुपुत्र आहेत. सध्या ते नवी मुंबईत वास्तव्यास असून त्यांचे मूळ गाव पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील काटेडे आहे. काटेडे येथे त्यांचे आलिशान घर असून शेती व्यवसायही आहे. या भव्य विवाहसोहळ्यामुळे इंदोरीकर महाराज पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. (Indorikar Maharaj)





