Paris Paralympics 2024 : कडक सॅल्यूट.! 22 वर्षांपूर्वी LoC वरील स्फोटात जवानाने गमावला होता पाय, आता देशासाठी जिंकलं पदक, जाणून घ्या…अशा या होकाटोची संघर्षमय कहाणी…

Paris Paralympics 2024 (Men’s Shotput F57) : भारतीय गोळाफेकपटू होकाटो होतोजे सेमा Hokato Hotozhe Sema ने इतिहास रचला आहे. पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मध्ये देशासाठी पदक मिळवून देणारा तो 27 वा खेळाडू ठरला आहे. 40 वर्षीय होकाटोने पुरुषांच्या शॉट पुट F57 स्पर्धेत अदम्य धैर्य दाखवले आणि 14.65 मीटर फेक करून स्पर्धेत तिसरे स्थान मिळविले. ज्यासह तो कांस्यपदक जिंकण्यात यशस्वी ठरला. या स्पर्धेत इराणच्या यासिन खोसरावीने 15.96 मीटरसह सुवर्णपदक तर ब्राझीलच्या पॉलिनो डोस सँटोसने 15.06 मीटरसह रौप्यपदक जिंकले.
पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारा होकाटो हा नागालँडचा पहिला खेळाडू आहे. आणखी एक भारतीय अॅथलीट सोमण राणा याने याच स्पर्धेत 14.07 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह पाचवे स्थान पटकावले. होकाटो सेमाने पॅरालिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यापूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली प्रतिभा दाखवली आहे. सेमाने आशियाई पॅरा गेम्स 2022 मध्ये कांस्यपदक तर 2022 मध्ये मोरोक्कन ग्रांप्रीमध्ये रौप्य पदक जिंकले होते. याशिवाय 2024 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये तो चौथ्या स्थानावर राहिला होता.
Another proud moment for India as Hokato Hotozhe Sema brings home the Bronze medal in Men’s Shotput F57. 🥳#Paris2024 #Cheer4Bharat #Paralympics2024@mansukhmandviya @IndiaSports @MIB_India @PIB_India @DDNewslive @ParalympicIndia @PCI_IN_Official @DDIndialive @AkashvaniAIR pic.twitter.com/8Kq1SqHhHc
— Doordarshan Sports (@ddsportschannel) September 7, 2024
कोण आहे होकाटो होतोजे सेमा…?
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर होकाटो होतोजे सेमा प्रसिद्धीच्या झोतात आला आहे. प्रत्येकाला त्याच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घ्यायचे आहे. त्याचे सध्याचे वय 40 वर्षे आहे. तो नागालँडचा आहे. त्यांचा जन्म 24 डिसेंबर 1983 रोजी एका सामान्य कुटुंबात झाला होता.
होकाटो होतोजे सेमाचे वडील शेतकरी आहेत. त्यांना एकूण 4 मुले आहेत. यापैकी होकाटो हे त्याचे दुसरे अपत्य आहे. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कांस्यपदक विजेता होकाटो वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाला होता.
Story of Lance Naik Hokato Sema 🇮🇳🫡pic.twitter.com/KNVnG3Ww3X
— The Khel India (@TheKhelIndia) September 6, 2024
भारतीय सैन्याच्या 9 आसाम रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून काम करत असताना पुढे एलिट स्पेशल फोर्सचा भाग बनण्याचे त्याचे स्वप्न होते, परंतु वयाच्या 18व्या वर्षी त्याचे हे स्वप्न भंगले. साल 14 ऑक्टोबर 2002 रोजी एलओसी (LOC) वरील काउंटर घुसखोरी ऑपरेशन दरम्यान होकाटो एका माइन स्फोटाच्या कचाट्यात सापडले आणि गंभीर जखमी झाले. या घटनेत त्याला डावा पाय गमवावा लागला होता.
Story of Lance Naik Hokato Sema 🇮🇳🫡pic.twitter.com/KNVnG3Ww3X
— The Khel India (@TheKhelIndia) September 6, 2024
आता रचला इतिहास…
या वेदनादायक घटनेने त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे स्वप्न भंगले. तरीही त्याने हार मानली नाही आणि आव्हानांना तोंड देत पुढे जात राहिला. अपघातानंतर लोकांच्या संवेदना हरवून बसतात, हार मानतात. मात्र होकाटो याने इतिहास रचला आहे. भारतीय सैन्याच्या 9 आसाम रेजिमेंटमध्ये हवालदार म्हणून काम केलेल्या होकाटो याने वयाच्या 32 व्या वर्षी पॅरा स्पोर्ट्समध्ये गोळाफेक प्रकारात भाग घेण्यास सुरुवात केली आणि खूप मेहनत घेतली. त्याचा परिणाम आता दिसून आला आहे. आता त्याने देशासाठी मोठी कामगिरी केली आहे. शॉटपुट F57 श्रेणी स्पर्धेत देशासाठी कांस्यपदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला आहे.





