Geert Wilders Threat Case : पाक मौलवीवर नेदरलॅन्डमध्ये खटला, 14 वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता….

स्चिफोल (नेदरलॅन्ड) – नेदरलॅन्डमधील खासदाराला धमकी दिल्याबद्दल पाकिस्तानातील एका मुस्लिम नेत्यावर खटला भरण्यात आला असून सरकारी बाजूने या नेत्याला १४ वर्षांची शिक्षा मिळावी अशी मागणी न्यायालयाकडे केली आहे. पाकिस्तानातील नेत्याच्या अनुपस्थितीतच या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे.
नेदरलँड्समध्ये गेल्या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या पक्षाचे नेते आणि इस्लामविरोधी खासदार गीर्ट वाइल्डर्स यांच्या हत्येला प्रवृत्त केल्याचा आरोप मुहम्मद अशरफ आसिफ जलाली या पाकिस्तानी मुस्लिम नेत्यावर ठेवण्यात आला आहे. या नेत्याला १४ वर्षांच्या शिक्षेची मागणी सरकारी वकिलांनी सोमवारी केली. धार्मिक नेता म्हणून आपल्या पदाचा गैरवापर करत वाइल्डर्सला फाशी देण्यासाठी किंवा शिरच्छेद करण्यास अनुयायांना बोलावल्याचा आरोप सरकारी वकिलांनी त्याच्यावर केला.
दुसऱ्या प्रकरणात सरकारी वकिलांनी दुसऱ्या पाकिस्तानी व्यक्ती साद रिझवीला वाइल्डर्सविरुद्ध दहशतवादी गुन्ह्यासाठी चिथावणी दिल्याबद्दल किंवा धमकी दिल्याबद्दल सहा वर्षांच्या शिक्षेची मागणी केली. रिझवीही त्यांच्या खटल्यासाठी हजर झाले नाहीत.
या दोघा आरोपींपैकी कोणीही नेदरलॅन्डमध्ये नसल्याचे मानले जात आहे आणि पाकिस्तानचा नेदरलँडसोबत प्रत्यार्पणाचा कोणताही करार देखील नाही. सरकारी वकिलांनी पाकिस्तानी अधिकाऱ्यांना पाठवलेल्या विनंत्या या दोघांपर्यंत पोचवल्या देखील गेल्या नाहीत आणि त्याचे प्रत्युत्तर देखील मिळू शकले नाही, असे सरकारी वकिलांनी सांगितले.
2019 मध्ये, नेदरलँड्समध्ये एका पाकिस्तानी व्यक्तीला अटक करण्यात आली, त्याला वाइल्डर्सवर दहशतवादी हल्ल्याची तयारी केल्याबद्दल दोषी ठरवून १० वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली. त्याला कधीकधी डच डोनाल्ड ट्रम्प म्हटले जाते.
Vladimir Putin : ब्लादिमिर पुतीन यांना मंगोलियात अटक होण्याची शक्यता
२० वर्षांपासून पोलीस संरक्षण…
वाईल्डर्स यांना यापूर्वीदेखील मुस्लिम नेत्यांकडून धमक्या दिल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यांना गेल्या २० वर्षांपासून पोलिसांचे संरक्षण देखील दिले गेले आहे. वाईल्डर्स हे इस्लामवर कडवट टीका करत असल्यामुळेच त्यांना या धमक्या मिळत असतात. गेल्या वर्षी, माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू खालिद लतीफ याला वाइल्डर्सच्या मृत्यूसाठी बक्षीस देऊ केल्याच्या आरोपावरून १२ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. लतीफही खटल्यासाठी हजर झाला नाही.





