Paris Olympics 2024 (Hockey) : फायनलसाठी एक संघ झाला निश्चित, सेमीफायनलमध्ये 4-0 ने मिळवला विजय…

Paris Olympics 2024 (Hockey, Netherland vs Spain) : पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये हॉकीचा पहिला उपांत्य सामना नेदरलँड आणि स्पेन यांच्यात खेळला गेला. या सामन्यात नेदरलँड्सने शानदार विजयाची नोंद केली. अशा प्रकारे त्यांनी अंतिम फेरी धडक मारत एक पदक तरी निश्चित केले आहे.
पहिल्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सने एकूण 4 गोल केले. तर स्पेनला एकही गोल करता आला नाही. अशाप्रकारे पहिल्या उपांत्य फेरीत नेदरलँड्सने स्पेनचा 4-0 असा सहज पराभव केला. आता अंतिम फेरीत त्याचा सामना भारत आणि जर्मनी यांच्यातील दुसऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी होईल.
𝐒𝐅𝟏 𝐅𝐮𝐥𝐥 𝐓𝐢𝐦𝐞: 𝐍𝐞𝐭𝐡𝐞𝐫𝐥𝐚𝐧𝐝𝐬 𝟒-𝟎 𝐒𝐩𝐚𝐢𝐧
Dominant Dutch storm into the men’s #Hockey final of #Paris2024 #Olympics, scoring two goals in each half.
This will be Netherlands 7th final appearance, their first since 2012, where they will attempt to win… pic.twitter.com/89q78xiuXy
— International Hockey Federation (@FIH_Hockey) August 6, 2024
नेदरलँडसाठी झिप जॅन्सनने पहिला गोल केला. जॅनसेनने पेनल्टी कॉर्नरच्या मदतीने पहिला गोल केला. नेदरलँडला पहिल्या क्वार्टर पर्यंत एकच गोल करता आला. थिरी ब्रिंकमनने दुसऱ्या क्वार्टरमध्ये नेदरलँड्ससाठी दुसरा गोल केला. येथून स्पेनचे मनोधैर्य खचताना दिसले. नेदरलँडसाठी तिसरा गोल थिज व्हॅन डॅमने केला. नेदरलँड्सने शेवटच्या 15 मिनिटांत आणखी एक गोल केला. ड्यूक टेलगेनकॅम्पने संघासाठी चौथा गोल केला. अशा प्रकारे नेदरलँड्सने 4-0 असा विजय मिळवला.
तत्पूर्वी, स्पेनने विद्यमान चॅम्पियन बेल्जियमचा 3-2 असा पराभव करून सर्वांनाच चकित केले होते आणि उपांत्य फेरी गाठली होती तर दुसरीकडे नेदरलँडने टोकियो ऑलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ऑस्ट्रेलियाचा 2-0 ने पराभव करताना उपांत्य फेरीत धडक मारली होती.





