BJP Leader : भाजपच्या दिग्गज नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; आमदार-खासदारांचे सर्व दौरे रद्द; राजकीय वर्तुळात शोककळा
BJP Leader : अयोध्या विधानसभा मतदारसंघातील भाजपचे वरिष्ठ स्थानिक नेते आणि परसवा गावचे रहिवासी विजय मिश्रा यांचा भीषण रस्ते अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला.

BJP Leader : अयोध्या विधानसभा मतदारसंघातील भाजप नेते आणि परसवा गावचे रहिवासी विजय मिश्रा यांचा भीषण रस्ते अपघातात मृत्यू झाला. शनिवारी रात्री घरी परतत असताना डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या विजय मिश्रा यांना तातडीने दर्शननगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (BJP Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, विजय मिश्रा हे शनिवारी, 8 ऑगस्ट रोजी मिल्कीपूर बाजारातून आपल्या परसवा गावाकडे दुचाकीवरून निघाले होते. घरी परतत असताना रस्त्यात त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, विजय मिश्रा गंभीर जखमी झाले. (BJP Leader)
अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी विजय मिश्रा यांना तातडीने दर्शननगर येथील मेडिकल कॉलेजमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (BJP Leader)
भाजप नेत्यांनी दौरे रद्द करत रुग्णालय गाठले
विजय मिश्रा यांच्या अपघाती मृत्यूची बातमी समोर येताच भाजपच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली. मिल्कीपूरचे आमदार चंद्रभानु पासवान, माजी खासदार लल्लू सिंह आणि महापौर गिरीशपति त्रिपाठी यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी आपले दौरे रद्द करून रुग्णालय गाठले. विजय मिश्रा यांच्या निधनाने भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (BJP Leader)
रविवारी अंत्यसंस्कार
अपघात रात्री उशिरा झाल्याने त्याच दिवशी शवविच्छेदनाची प्रक्रिया होऊ शकली नाही. रविवारी, 9 ऑगस्ट रोजी दुपारी शवविच्छेदन पूर्ण झाल्यानंतर पोलिसांनी मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला. (BJP Leader)
मृतदेह परसवा गावात पोहोचताच कुटुंबीय आणि ग्रामस्थांवर दुःखाचा डोंगर कोसळला. नातेवाईकांचा आक्रोश हृदयद्रावक होता. रविवारी दुपारी कुटुंबीय, नातेवाईक आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत विजय मिश्रा यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. (BJP Leader)
पत्नी आणि चार मुलांवर दुःखाचा डोंगर
विजय मिश्रा यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. त्यांच्या दोन मुलींचे विवाह झाले असून मुलगा आणि धाकटी मुलगी अद्याप अविवाहित आहेत. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीच्या अचानक निधनामुळे परिवारावर मोठे संकट ओढवले आहे. (BJP Leader)
या दुर्दैवी घटनेबद्दल भाजप नेत्यांनी शोक व्यक्त केला असून, या कठीण प्रसंगी पक्ष आणि कार्यकर्ते मिश्रा कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, असे आश्वासन देण्यात आले आहे. तसेच शासन स्तरावरूनही कुटुंबाला आवश्यक ती मदत केली जाईल, असे सांगण्यात आले. (BJP Leader)
Bjp Leader : भाजपच्या तडफदार तरुण नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा
BJP Leader : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा





