Bjp Leader : भाजपच्या तडफदार तरुण नेत्याचा भीषण अपघातात मृत्यू; राजकीय वर्तुळात शोककळा
Bjp Leader : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात भाजप युवा मोर्चाचे माजी नगर उपाध्यक्ष आलोक सिंह त्यागी (वय २७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

Bjp Leader : उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे झालेल्या भीषण रस्ते अपघातात भाजप युवा मोर्चाचे माजी नगर उपाध्यक्ष आलोक सिंह त्यागी (वय २७) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे भाजपसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. (Bjp Leader)
मिळालेल्या माहितीनुसार, लखपेडाबाग परिसरातील रहिवासी असलेले आलोक सिंह त्यागी बुधवारी रात्री दुचाकीवरून घरी परतत होते. नगर कोतवालीसमोरून जात असताना भरधाव वेगाने आलेल्या डीसीएम वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की ते गंभीर जखमी झाले. (Bjp Leader)
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी रुग्णालयात धाव घेतली. (Bjp Leader)
आलोक सिंह त्यागी हे भाजप युवा मोर्चाचे माजी नगर उपाध्यक्ष होते. पक्ष संघटनेतील कामासोबतच ते सामाजिक उपक्रमांमध्येही सक्रिय सहभाग घेत असल्याने परिसरात त्यांची ओळख होती. (Bjp Leader)
दरम्यान, पोलिसांनी अपघातग्रस्त डीसीएम वाहन जप्त करून चालकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून तपासाच्या निष्कर्षांनुसार आवश्यक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. (Bjp Leader)
या दुर्दैवी घटनेनंतर भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी आणि स्थानिक नागरिकांकडून आलोक सिंह त्यागी यांना श्रद्धांजली वाहण्यात येत असून त्यांच्या निधनाबद्दल सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Bjp Leader)
BJP Leader : भाजपचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्र्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा





