Uddhav Thackeray : “मी गद्दारांच्या पाठीशी!” मोदी कुणाला धमकीवजा संदेश देत आहेत? उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
Uddhav Thackeray : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray : शिवसेना पक्षाच्या प्रलंबित प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. जंतरमंतरवर आंदोलन करणाऱ्या तरुणांना भेटण्यासाठी पंतप्रधानांकडे वेळ नाही, मात्र “गद्दारांना भेटायला वेळ आहे”, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. (Uddhav Thackeray)
पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, गेल्या चार वर्षांपासून शिवसेना पक्षाशी संबंधित प्रकरण न्यायालयात प्रलंबित आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने आपण त्यावर भाष्य केलेले नाही आणि यापुढेही करणार नाही. संविधानाप्रमाणे न्यायालयाकडून निकाल दिला जाईल, असा पूर्ण विश्वास असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, देशातील सध्याचे राजकीय वातावरण पाहता काही घटनांवर बोलणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray)
“तरुणांना भेटायला वेळ नाही, गद्दारांना भेटायला वेळ आहे”
देशातील तरुण आपल्या न्याय्य हक्कांसाठी आंदोलन करत असताना त्यांच्यावर लाठीचार्ज, अश्रुधुराचा वापर आणि इतर प्रकारे कारवाई करण्यात आली. मात्र, या तरुणांशी संवाद साधण्यासाठी पंतप्रधान किंवा गृहमंत्र्यांकडे वेळ नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray)
दुसरीकडे, शिवसेनेतील बंडखोर खासदारांनी पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीनंतर “भिऊ नका, मी तुमच्या पाठीशी आहे”, असा संदेश पंतप्रधानांनी दिल्याचा दावा उद्धव ठाकरे यांनी केला. (Uddhav Thackeray)
यावरून त्यांनी थेट सवाल केला, “हे वाक्य नेमकं कोणाला सांगितलं जात आहे? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असताना अशा प्रकारचा संदेश देण्यामागे नेमका हेतू काय? कोर्टाला धमकावत आहात का?” (Uddhav Thackeray)
“गद्दारीचा डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून आलेलं नाही”
यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजपच्या कथित ‘वॉशिंग मशीन’च्या राजकारणावरही टीका केली. विरोधी पक्षातील नेते सत्ताधारी पक्षात गेल्यानंतर त्यांच्यावरील आरोप आणि कारवाया थांबतात, असा आरोप त्यांनी केला. (Uddhav Thackeray)
“कितीही गुन्हे करा, वॉशिंग मशीनमध्ये गेल्यानंतर डाग धुतले जातात. मात्र गद्दारीचा डाग धुणारं वॉशिंग मशीन अजून भाजपकडे आलेलं नाही,” असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. (Uddhav Thackeray)
“ही लढाई आता फक्त शिवसेनेपुरती राहिलेली नाही”
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे यांनी ही लढाई केवळ शिवसेनेपुरती मर्यादित नसल्याचे म्हटले. पक्षांतर आणि राजकीय फोडाफोडीची पद्धत देशभर वाढत असल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही आणि संविधानावर विश्वास असलेल्या नागरिकांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. (Uddhav Thackeray)
“गद्दारी करा, आमच्याकडे या आणि आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, असा संदेश दिला जात आहे. हा संदेश इतर पक्षांमधील संभाव्य बंडखोर खासदारांनाही दिला जात आहे का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. (Uddhav Thackeray)
देशातील तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणावर असंतोष निर्माण झाला असून ही परिस्थिती गांभीर्याने घेण्याची गरज आहे. संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. (Uddhav Thackeray)






