Pune : मोठी बातमी ! पुणे जिल्ह्यात 13 ते 26 जूनपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू
Pune : या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.

Pune : ग्रामीण भागात दि.१३ जून ते २६ जून २०२६ पर्यंत जमावबंदी आदेश निवासी उपजिल्हाधिकारी यांनी लागू केला आहे. तसेच पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण यांची पूर्वपरवानगी घेतल्याशिवाय पाचपेक्षा जास्त व्यक्तींचा जमाव करणे, सभा घेणे किंवा मिरवणुका काढणे यांनाही बंदी घालण्यात आली आहे.
जिल्ह्यात अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) व (३) अन्वये जमावबंदी आदेश लागू केला आहे. या कालावधीत दाहक अथवा स्फोटक पदार्थ बाळगणे, दगड, शस्त्रे, काठ्या, तलवारी, बंदुका आदी इजा पोहोचवू शकणारी साधने बाळगणे, मोठ्याने अर्वाच्य घोषणा देणे, प्रतिकात्मक पुतळ्यांचे प्रदर्शन किंवा दहन करणे तसेच कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणारी आवेशपूर्ण भाषणे करणे यास मनाई करण्यात आली आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम १३५ नुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे अपर जिल्हादंडाधिकारी ज्योती कदम यांनी सांगितले.





