मंचर- येथील संत ज्ञानेश्वर पतसंस्थेला 31 लाख 45 हजार रुपयांचा नफा झाला असून संस्थेला ऑडिट वर्ग अ मिळाला आहे. एनपीए शून्य टक्के असल्याने संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष यतीनकुमार हुले यांनी दिली.
संत ज्ञानेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेची 19वी वार्षिक सर्वसाधारण सभा मंचर येथील शिवगिरी मंगल कार्यालयात संस्थेचे अध्यक्ष अभियंता यतीनकुमार हुले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष जगदिश घिसे, संचालक डॉ. संतोष भालेराव, नवनाथ बाणखेले, अनिल लबडे, सतीश बाणखेले, अशोक गांजाळे, कैलास बांगर, दिनकर सैद, बबन सोनवणे, मधुकर गायकवाड, संचालिका ललिता काळे, ऍड. नवनाथ निघोट उपस्थित होते.
यावेळी पुणे येथील लेखापरीक्षक विजय भोईटे यांनी सभासदांना प्रशिक्षण दिले. पतसंस्थेच्या मंचर आणि पेठ येथे दोन शाखा आहेत. मागील आर्थिक वर्षात सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. कोल्हापूर आणि सांगली येथील पूरग्रस्तांना संस्थेच्या वतीने 11 हजार रुपयांची मदत देण्यात आली. पतसंस्थेने 28 कोटी व्यवसायाचा टप्पा पार केला असून 12 कोटी 51 लाखांचे कर्ज वाटप केले आहे.
15 कोटी 48 कोटी लाख रुपयांच्या ठेवी आहेत. 6 कोटी 33 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे. सभासदांना 15 टक्के लाभांश दिला जाणार आहे, अशी माहिती हुले यांनी दिली. संस्थेचे ज्येष्ठ सभासद शशिकांत कडधेकर, विठ्ठल महामुनी, रामचंद्र शिंदे, आशिष पुंगलिया, हिरामण भोर, प्रा. राजू बाणखेले, विजय घिसे, चित्तरंजन कोरे आदींनी चर्चेत सहभाग घेतला. पतसंस्थेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता पोखरकर यांनी अहवाल वाचन केले. डॉ. संतोष भालेराव यांनी सूत्रसंचालन केले, तर उपाध्यक्ष जगदिश घिसे यांनी आभार मानले.