Pune District : ४० गुंठ्यात १०९ टन ऊस उत्पादन

माळेगाव : माळेगाव बुद्रुक येथील ऊस उत्पादक शेतकरी विजय निवृत्ती तावरे यांनी एक एकर क्षेत्रामध्ये उसाचे तब्बल १०९ टन उत्पादन घेतले. हा परिसरातील उच्चांक आहे. तावरे यांना एकरी १०९ टनाचे उत्पादन मिळाले आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रयोगशील शेती केली तर शेती तोट्यात जात नाही, हेच तावरे यांनी सिद्ध केले आहे. त्यांनी आपल्या शेतात उसाचे उत्पादन घेतले आहे. हा ऊस ५४ ते ५५ कांड्यांचा आहे. काही उसाला तब्बल ५८ कांड्या आहेत. एकरी १०९ टन उसाचे उत्पन्न त्यांनी घेतले आहे. त्यांनी ४० गुंठ्यांत १०९ टन उसाचे उत्पादन घेतले आहे. ते ५४ ते ५५ कांड्यांचा ऊस असून त्याची उंची ४० ते -४२ फुटांहून अधिक आहे.
माळेगाव बुद्रुक येथील गट नंबर ६४१ या क्षेत्रात विजय तावरे यांनी १५ जुलै २०२३ रोजी फुले २६५ या जातीच्या उसाची लागवड केली. यासाठी त्यांनी चार फुटी पट्टा पद्धत अशी सरी सोडली होती. शेणखतावर भर दिला. माळेगाव बुद्रुक येथील अजित कोंढाळकर आणि प्रवीण चव्हाण यांच्या नर्मदा ॲग्रोटेक कंपनीच्या मार्गदर्शनाखाली नर्मदा मॅग्नेशियम सल्फे, नर्मदा फेरस सल्फेट, नर्मदा झिंक सल्फेट, नर्मदा रूट झाईम+ व नर्मदा निम संपत्ती व विद्राव्य खतांचा वापर केला. ड्रीपचा वापर केला होता. त्यामुळे पाणी पुरसे दिले गेले. नर्मदा ऍग्रोटेक यांच्या मार्गदर्शनाखाली विद्राव्य खताची योग्य मात्रा उसाला देता आली. वेळेवर पाणी, उत्तम मेहनत व नियोजन यामुळे १८ महिन्यांतच या उसाची मोठ्या पेऱ्यांसह लांबलचक ५४ कांड्यांपर्यंत वाढ झाली.
ऊस उत्पादनातून त्यांना चालू बाजारभावानुसार जवळपास एकरी ३.५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. या यशाबद्दल माळेगाव सहकारी साखर कारखान्याची चेअरमन ॲड. केशवराव जगताप, व्हाईस चेअरमन तानाजीराव देवकाते, कार्यकारी संचालक अशोक पाटील, शेतकी अधिकारी सुरेश काळे, शेतकरी, सभासदांनी विजय तावरे व त्यांच्या कुटुंबाचे कौतुक केले आहे.
ऊस उत्पादन करीत असताना प्रामाणिकपणे शेतीवर दिलेली लक्ष आणि केलेले कष्ट यातून १०९ टन ऊस उत्पादन करण्याचे तावरे कुटुंबाला हे यश मिळाले आहे. माळेगाव बुद्रुक येथील नर्मदा ॲग्रोटेक या खत एजन्सीचेही भरपूर सहकार्य लाभले.
-संतोष विजयराव तावरे, शेतकरी.
माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे सभासद शेतकरी व इतर शेतकरी बंधूंना उत्तम दर्जाचे खत पुरवून योग्य मार्गदर्शन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात जास्तीत जास्त भर कशी पडेल, यासाठी आम्ही नर्मदा ॲग्रोटेक कंपनीचे योगदान राहिले आहे.
– अजित कोंढाळकर, प्रवीण चव्हाण.
नर्मदा ॲग्रोटेक कंपनी, माळेगाव बुद्रुक.





