नेटफ्लिक्‍सवरच्या सुपरहिरो फिल्ममध्ये प्रियांका चोप्रा

प्रियांका चोप्राला हॉलिवूडमधील आणखी एक प्रोजेक्‍ट मिळाला आहे. नेटफ्लिक्‍सवरच्या लहान मुलांसाठीच्या सुपरहिरो फिल्ममध्ये ती दिसणार आहे. “ऍलिटा : बॅटल एजंल’च्या रॉबर्ट रॉड्रीग्जवर या वेब फिल्मच्या डायरेक्‍शनची जबाबदारी असणार आहे. रॉड्रीग्ज या वेब फिल्मचे लेखन, डायरेक्‍शन आणि प्रॉडक्‍शनही करणार आहे. “वुई कॅन बी हिरोज’ असे या वेब फिल्मचे शिर्षक आहे.

पृथ्वीवरच्या सुपरहिरोंचे परग्रहावरील जीव अपहरण करतात. या सुपरहिरोंची मुले एकत्र येतात आणि आपल्या पालकांची आणि पृथ्वीची या परग्रहावरील जीवांच्या तावडीतून सुटक करतात, अशी या वेब फिल्मची कथा आहे. यामध्ये प्रियांका मिस. ग्राडेन्को नावाच्या महिलेचे पात्र साकारणार आहे. यापूर्वी रेबेल विल्सनचा लीड रोल असलेल्या “इसन्ट इट रोमॅंटिक’ या हॉलिवूडपटामध्ये प्रियांका होती. अमेरिकेत थिएटरमध्ये रिलीज झालेला हा सिनेमा फेब्रुवारीमध्ये नेटफ्लिक्‍सवरही रिलीज झाला होता.

प्रियांका सध्या “द स्काय इज पिंक’च्या प्रमोशनमध्येही बिझी आहे. “द स्काय…’ ऑक्‍टोबरमध्ये रिलीज होणार आहे आणि टोरांटो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्येही तो दाखवला जाणार आहे. “मिंडी कॅलिंग’ हा आणखी एक हॉलिवूडपटही तिच्याजवळ आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×