#PKLSeason11 : प्रो कबड्डी लीग सीझन 11 चे वेळापत्रक जाहीर, ‘या’ दोन संघाच्या लढतीने होणार सुरुवात; जाणून घ्या सर्व डिटेल्स…

Pro Kabaddi League 2024 :- प्रो कबड्डी लीगचा 11 वा हंगाम 18 ऑक्टोबरपासून सुरु होणार असून पहिल्याच लढतीमध्ये तेलुगू टायटन्स आणि बेंगळुरू बुल्स हे दोन संघ आमनेसामने असतील. हैदराबाद मध्ये स्पर्धेचा पहिला टप्पा 18 ऑक्टोबर ते 9 नोव्हेंबर दरम्यान रंगणार आहे. दुसरा टप्पा 10 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर असा नोएडा येथे तर तिसरा टप्पा 3 डिसेंबर ते 24 डिसेंबर असा पुण्यातील बालेवाडी स्टेडियम येथे घेण्यात येणार आहे.
सलामीच्या लढतीत स्टार रेडर पवन सेहरावत व अनुभवी प्रदीप नरवाल यांचा खेळ पाहता येऊ शकेल. दुसरी लढत यु मुंबा व दबंग दिल्ली यांच्यात होणार असल्याचे आयोजक अनुपम गोस्वामी यांनी सांगितले.
🚨 𝗣𝗔𝗥𝗧 𝟭 • 𝗣𝗞𝗟 𝗦𝗘𝗔𝗦𝗢𝗡 𝟭𝟭 𝗦𝗖𝗛𝗘𝗗𝗨𝗟𝗘 🚨 pic.twitter.com/MBqFxGCw4r
— ProKabaddi (@ProKabaddi) September 9, 2024
पुणेरी पलटणने पटकावले होते अखेरचे विजेतेपद…
प्रो कबड्डी लीग सीझन 11 चे सर्व सामने स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि डिस्ने प्लस हॉटस्टारवर थेट प्रक्षेपित केले जातील. पुणेरी पलटणने हरियाणा स्टीलर्सचा 28-25 असा पराभव केल्यामुळे PKL च्या 10 व्या सत्राची रोमहर्षक समाप्ती झाली. पुणेरी पलटण प्रथमच चॅम्पियन ठरला होता.





