Pro Kabaddi League 2024 | बेंगळुरू बुल्स-गुजरात जायंट्स लढत बरोबरीत…

Pro Kabaddi League 2024 (Bengaluru Bulls vs Gujarat Giants) : – प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 89 व्या सामन्यात बेंगळुरू बुल्स आणि गुजरात जायंट्स आमने-सामने होते. दोन्ही संघांनी एकमेकांना कडवी टक्कर दिली पण हा सामना 34-34 असा बरोबरीत सुटला.
Pune leg giving us thrillers right from the start 🤩#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #GujaratGiants pic.twitter.com/pk3Xf121tT
— ProKabaddi (@ProKabaddi) December 3, 2024
पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल म्हाळुंगे बालेवाडी येथील बॅडमिंटन हॉलमध्ये झालेल्या आजच्या लढतीत दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. मध्यंतराला बुल्स संघाने 15-13 अशी आघाडी घेतली होती.
लढतीमध्ये दोन्ही संघांनी चढाईतून प्रत्येकी 16 गुणांची कमाई केली. तर पकडीतून बुल्सने 15 तर जायंट्स संघाला 14 गुणांची कमाई करता आली. दोन्ही संघांनी एकमेकांवर लोन चढविताना प्रत्येकी 2 गुणांची कमाई करताना चांगली झुंज दिली.
Pro Kabaddi 2024 : दबंग दिल्लीचा थलायवाजवर विजय तर पटणा पायरेट्स बंगालवर ठरले भारी….
बंगळुरू बुल्सकडून नितीन रावलने तब्बल 7 पकडी केल्या. त्याला प्रदीप नरवाल व सुशील यांनी प्रत्येकी 6 गुण मिळविताना चांगली साथ दिली. गुजरात जायंट्स संघाकडून एस. राकेशने चढाईतून 5 तर पकडीतून 2 गुणांची कमाई केली. नीराज कुमारने 5 तर सोमबीर व रोहित यांनी प्रत्येकी 4 गुणांचे योगदान दिले.





