Pro Kabaddi 2024 (Match 123) | सनसनाटी विजयासह जयपूर पिंक पँथर्स प्ले-ऑफमध्ये, गतविजेते स्पर्धेतून बाहेर…

Pro Kabaddi League 2024 (Jaipur Pink Panthers vs Bengal Warriorz) : प्रो कबड्डी लीग 2024 च्या 123 व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने बंगाल वॉरियर्सचा 31-28 असा पराभव केला. यासह अभिषेक बच्चनचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरला असून अर्जुन देशवालने कर्णधार म्हणून पहिल्याच सत्रात संघाला अंतिम 6 मध्ये नेऊन इतिहास रचला आहे. गतविजेत्या पुणेरी पलटणचा प्रवास संपुष्टात आला आहे.
या सामन्यात बंगाल वॉरियर्सचा कर्णधार असलेल्या नितेश कुमारने एक मोठा पराक्रम केला आणि प्रो कबड्डी लीगमध्ये त्याचे 400 टॅकल पॉइंट पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो केवळ तिसरा बचावपटू ठरला आहे. त्यांच्या आधी फजल अत्राचली आणि सुरजित सिंग यांनी ही कामगिरी केली आहे.
पैंथर्स ने रोमांचक मुक़ाबले में वॉरियर्स को हराकर प्लेऑफ में बनाई जगह 🔥🩷#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #JaipurPinkPanthers #BengalWarriorz pic.twitter.com/oRGNV7Dm7x
— ProKabaddi (@ProKabaddi) December 20, 2024
शेवटपर्यंत अतिशय रंगतदार झालेल्या लढतीत जयपूर पिंक पँथर्स संघाने दहा गुणांची पिछाडी भरून काढत बंगाल वॉरियर्सवर रोमहर्षक विजय मिळविला आणि प्रो कबड्डी लीग मध्ये प्ले ऑफ मध्ये आपले स्थान निश्चित केले.
बंगालने आजच्या लढतीत दहाव्या मिनिटाला 8-6 अशी आघाडी घेतली होती. बंगालच्या नितेश कुमार याने पकडीमधील चारशे गुणांचा टप्पा ओलांडला. मध्यंतराला पाच मिनिटे बाकी असताना बंगालने पहिला लोण नोंदवत जयपूरवर 14-7 अशी आघाडी घेतली. मध्यंतराला त्यांनी 19-9 अशी आघाडी वाढविली.
Pro Kabaddi 2024 (Match 121) | गुजरात जायंट्सचा लाजीरवाणा पराभव, यूपी योद्धाज 36 गुणांनी विजयी…
उत्तरार्धात जयपूरच्या खेळाडूंनी खेळ उंचावला. शेवटची दहा मिनिटे बाकी असताना जयपूर 19-22 असा पिछाडीवर होता. 33 व्या मिनिटाला त्यांनी लोण चढवित 25-24 अशी 1 गुणाची आघाडी घेतली. नंतर पुन्हा 27-27 अशी बरोबरी झाली. त्यानंतर जयपूर संघाच्या खेळाडूंनी अष्टपैलू खेळ करत विजय साकारला. जयपूरकडून अर्जुन देशवाल, अभिजीत मलि, रेझा मीरबाघेरी यांनी तर बंगालकडून अर्जुन राठी, प्रणय राणे यांनी उल्लेखनीय कामगिरी केली.





