Pro Kabaddi League 2024 : बंगाल वॉरियर्स-पुणेरी पलटण लढत बरोबरीत, फझल अत्राचलीचा मोठा विक्रम…

Pro Kabaddi League 2024 (Bengal Warriorz vs Puneri Paltan,Match 23) : प्रो कबड्डी लीगमध्ये बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटण यांच्यात खेळलेला सामना 32-32 असा बरोबरीत सुटला. एकेकाळी पुणेरी पलटण संघ खूप पुढे होता पण उत्तरार्धात बंगालचा रेडर सुशीलने चमकदार कामगिरी करत संघाला सामन्यात परत आणले. या सामन्यात सुशीलने सुपर-10 पूर्ण केले तर कर्णधार फजल अत्राचलीने 500 टॅकल पॉइंट्स पूर्ण करत मोठा विक्रम केला. पीकेएलमध्ये 500 टॅकल पॉइंट मिळवणारा तो पहिला बचावपटू ठरला. पुणेरी पलटणकडून आकाश शिंदे आणि पंकज मोहिते यांनी प्रत्येकी 8 गुण घेतले.
It’s the third tie of #PKL11 🔥 WHAT A GAME❗️
Get all the LIVE updates on 👉 https://t.co/cfORnV9MAP or the Pro Kabaddi Official App📱#ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #PuneriPaltan pic.twitter.com/7rDhewxQIV
— ProKabaddi (@ProKabaddi) October 29, 2024
हैदराबाद येथील गचीबोवली येथील इनडोर स्टेडियममध्ये मंगळवारी झालेल्या लढतीत दोन्ही संघांनी दमदार खेळाचे प्रदर्शन केले. पहिल्या सत्रात पुणेरी पलटण संघाने 15-12 अशी 3 गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी प्रत्येकी 6 गुण चढाईतून तर प्रत्येकी 6 गुण पकडीतून मिळविले. मात्र, पुणेरी पलटणने बंगला वॉरियर्ससंघावर लोण चढविताना 2 जास्तीच्या गुणांची कमाई केली.
दुसऱ्या सत्रात मात्र बंगाल वॉरियर्सने पुणेरी पलटण पेक्षा उजवा खेळ करताना 20 गुणांची कमाई केली. मात्र, पुणेरी पलटण संघाला 17 गुणांची कमाई करता आली. बंगाल वॉरियर्ससंघाने दुसऱ्या सत्रात चढाईतून 15 गुणांची तर पकडीतून केवळ 3 गुणांची कमाई केली. पुणेरी पलटण संघाने चढाईतून 11 तर पकडीतून 4 गुणांची कमाई केली. दोन्ही संघांनी एकमेकांवर लोण चढविताना प्रत्येकी 2 गुणांची कमाई केली.
Pro Kabaddi League 2024 : तेलुगू टायटन्सचा शानदार विजय, पटना पायरेट्सचा 2 गुणांनी केला पराभव…
आजच्या लढतीत बंगालच्या सुशील खांबरेकरने सुपर 10 पूर्ण केले. त्याला राईट रेडर नितीन धनकरने 6 तर नितीशकुमारने 4 व फझल अत्राचलीने 3 गुणांची कमाई करताना सुरेख साथ दिली. पुणेरी पलटणकडून आकाश शिंदेने 8 गुण चढाईतून कमाविले. अभिनेश नंदराजन, अस्लम इनामदार यांनी प्रत्येकी 3 गुणांची कमाई करताना लढत बरोबरीत राखली.





