Pro Kabaddi League 2024 (Patna Pirates vs Jaipur Pink Panthers) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 99 वा सामना तीन वेळा चॅम्पियन पटना पायरेट्स आणि दोन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या जयपूर पिंक पँथर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात पाटणा पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सचा 38-28 असा दारूण पराभव केला. या सामन्यात देवांकने पुन्हा एकदा पटणा पायरेट्ससाठी चमकदार कामगिरी करत 14 गुण मिळवले. तर अंकितने बचावात हाय फाईव्ह पूर्ण केले. जयपूर पिंक पँथर्ससाठी कर्णधार अर्जुन देशवालने सर्वाधिक 7 गुण घेतले.
Pirates jump to the 2️⃣nd spot as they beat the Panthers 🤯#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PatnaPirates #JaipurPinkPanthers pic.twitter.com/gYtGfUoqoI
— ProKabaddi (@ProKabaddi) December 8, 2024
पहिल्या हाफच्या पहिल्या काही मिनिटांत दोन्ही संघांमध्ये कडवी झुंज पाहायला मिळाली. मात्र, जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा पाटणा पायरेट्स संघाने वर्चस्व राखण्यास सुरुवात केली. देवांक पाटणा पायरेट्ससाठी गुण मिळवत होता पण संघ बचावात बरेच गुण गमावत होता आणि त्यामुळे संघ सामन्यात मागे पडत होता. जयपूर पिंक पँथर्ससाठी कर्णधार अर्जुन देशवाल पुन्हा एकदा चमकदार कामगिरी करत होता आणि त्याला अंकुशकडून बचावात उत्तम साथ मिळत होती. याच कारणामुळे पूर्वार्धाच्या अखेरीस जयपूर पिंक पँथर्सने पाटणा पायरेट्सला ऑलआऊट करत मोठी आघाडी घेतली होती.
उत्तरार्धात पाटणा पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सला ऑलआऊट करत हिशोब चुकता केला आणि त्यामुळे ते आघाडीवर आले. जयपूर पिंक पँथर्सची तीच कमजोरी पुन्हा एकदा समोर आली. रेडिंगमध्ये फक्त अर्जुन देशवाल गुण मिळवत होता पण त्याला इतर रेडर्सची साथ मिळत नव्हती.
Pro Kabaddi 2024 (Match 95) : गुजरात जायंट्सचा आणखी एक पराभव, प्लेऑफची वाट झाली खडतर…
दुसऱ्या हाफमध्ये पाटणा पायरेट्सकडून देवांक जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत होता. या हाफमध्ये अंकुश आणि अर्जुन देशवाल यांना गुण मिळत नव्हते आणि त्यामुळे पाटणा पायरेट्सची सामन्यावर पकड घट्ट झाली होती. सामन्याला पाच मिनिटे बाकी असताना पाटणा पायरेट्सने पुन्हा एकदा जयपूर पिंक पँथर्सला ऑलआऊट केले आणि येथून जयपूरचा पराभव निश्चित झाला. यानंतर पाटणा पायरेट्सने सामना सहज जिंकला.