IAF Plane Crash: विमानात बिघाड झाल्याचं कळताच लोकवस्तीपासून दूर नेलं, नंतर पॅराशूटद्वारे बाहेर; हवाई दलाचं जग्वार लढाऊ विमान कोसळलं

IAF Plane Crash: हरियाणातील पंचकुला येथे भारतीय हवाई दलाचे लढाऊ जग्वार विमान कोसळले आहे. विमानाने अंबाला येथून उड्डाण केले होते. ते प्रशिक्षण उड्डाण होते. वैमानिकाने प्रसंगावधन साधून पॅराशूटद्वारे वेळेत विमानातून बाहेर पडण्यात यशस्वी झाले. हा अपघात पंचकुलाच्या मोरनी तालुक्यातील बलदवाला गावात झाला.
“भारतीय हवाई दलाचे एक जग्वार लढाऊ विमान आज हरियाणातील अंबाला येथे कोसळले. विमानाने अंबाला एअरबेसवरून प्रशिक्षणासाठी उड्डाण केले होते. वैमानिक विमानातून बाहेर निघाले. अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती भारतीय हवाई दलाकडून देण्यात आली आहे.
भारतीय हवाई दलाच्या म्हणण्यानुसार, पायलटला सिस्टममध्ये बिघाड झाल्याचे लक्षात आले, त्यानंतर त्यांनी विमानातून सुरक्षितपणे बाहेर पडण्यापूर्वी ते निवासी भागातून दूर नेले.
A Jaguar aircraft of the IAF crashed at Ambala, during a routine training sortie today, after encountering system malfunction. The pilot maneuvered the aircraft away from any habitation on ground, before ejecting safely.
An inquiry has been ordered by the IAF, to ascertain the…
— Indian Air Force (@IAF_MCC) March 7, 2025
आयएएफने सांगितले की, वैमानिकाने सुरक्षितपणे बाहेर पडण्यापूर्वी विमानाला जमिनीवरील लोकवस्तीच्या भागापासून दूर नेले. हवाई दलाने अपघाताचे कारण शोधण्यासाठी तपासाचे आदेश दिले आहेत.
जग्वार हे ब्रिटिश-फ्रेंच क्लोज एअर सपोर्ट आणि ग्राउंड ॲटॅक एअरक्राफ्ट आहे. हे विमान 1960 च्या उत्तरार्धात विकसित केले गेले आणि भारत हा एकमेव देश आहे जो अजूनही आपल्या हवाई दलात हे विमान वापरत आहे.





