Pro Kabaddi League 2024 : अर्जुन देशवालची धडाकेबाज कामगिरी, पिंक पँथरची टायटन्सवर एकतर्फी मात…

Pro Kabaddi League 2024 :- प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 9वा सामना जयपूर पिंक पँथर्स विरूध्द तेलगू टायटन्स यांच्यात खेळवला गेला. या सामन्यात (Telugu Titans vs Jaipur PinkPanthers) अर्जुन देशवालच्या धडाकेबाज कामगिरीच्या जोरावर जयपूर पिंक पँथर्सने तेलगू टायटन्सला 52-22 असे एकतर्फी पराभूत केले. अशाप्रकारे तेलुगू टायटन्सला 30 गुणांनी मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले.
जयपुर पिंक पैंथर्स का विजयी अभियान जारी 🔥
तेलुगू टाइटंस पर दर्ज की शानदार जीत 💪 #ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TeluguTitans #JaipurPinkPanthers pic.twitter.com/Sedt6OPNeE
— ProKabaddi (@ProKabaddi) October 22, 2024
हैदराबाद येथील गच्चीबोवली येथील मैदानावर झालेल्या लढतीमध्ये जयपूरच्या अर्जुन देशवालने चढायांच्या माध्यमातून तब्बल 17 गुणांची कमाई केली. त्याला अभिजित मलिकने 7 चढाया तर 1 एक पकड करताना सुरेख साथ दिली. पिंक पँथर्सच्या सुरजीत सिंगने 4, रेझा मीरबाघरीने 3 तर अंकुशने 2 पकडी करताना संघाच्या विजयला हातभार लावला. पँथर संघाने टायटन्सवर लोण चढविताना तब्बल 8 गुण मिळविले.
Pro Kabaddi League 2024 : गतविजेत्या पुणेरी पलटणचा सलग दुसरा विजय, पटना पायरेट्सचा केला दारूण पराभव…
टायटन्सला आजच्या लढतीत अपेक्षेप्रमाणे कामगिरी करता आली नाही. पवन सेहरावतने चढाईतून 5, पकडीतून 1 व 1 बोनस असे केवळ 7 गुण मिळविले. आशिष नरवालने 2 तर विजय मलिकने 3 पकडी केल्या. स्पर्धेत जयपूर संघाने दोन्ही लढती जिंकून 10 गुणांसह गुणतालिकेत अव्वल स्थान राखले आहे. तेलगू टायटन्सने 3 पैकी केवळ एका लढतीत विजय मिळविल्याने ते सातव्या स्थानावर आहेत.





