Pro Kabaddi League 2024 : रोमहर्षक लढतीत जयपूर पिंक पँथर्सचा बंगाल वॉरियर्सवर विजय…

Pro Kabaddi League 2024 (हैदराबाद) :- सातव्या मोसमातील चॅम्पियन बंगाल वॉरियर्स आणि पहिल्या मोसमातील चॅम्पियन जयपूर पिंक पँथर्स रविवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील पाचव्या सामन्यात आमनेसामने आले होते. प्रो-कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामाच्या झालेल्या अतिशय अतितटीच्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने बंगाल वॉरियर्सचा 39-34 अशा 5 गुणांनी पराभव केला.
पैंथर्स के पंजों ने वॉरियर्स को किया घायल 🐾🤩
शानदार जीत के साथ किया #PKL11 सीज़न का विजयी आग़ाज़ 🔥 #ProKabaddi #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #JaipurPinkPanthers pic.twitter.com/8QQmW0V8My
— ProKabaddi (@ProKabaddi) October 20, 2024
मध्यंतरीच्या संघर्षानंतर पिंक पँथर्सने शानदार पुनरागमन करत सामना जिंकला. रेड मशीन म्हणून ओळखला जाणारा अर्जुन देशवाल हा जयपूर पिंक पँथर्सच्या विजयाचा नायक होता. या सामन्यादरम्यान पिंक पँथर्सचा कर्णधार अर्जुन देशवालने सर्वाधिक 15 गुण मिळवले.
तर दुसरीकडे बंगालकडून नितीनने सर्वाधिक 13 गुण मिळवले. तर बंगालकडून नीतीनने सर्वाधिक 13 गुण मिळवले. तर बचावात अभिजीतने सर्वाधिक 4 तर बंगालकडून फाझेल अत्राचलीने 5 गुणांची कमाई केली मात्र तो संघाचा पराभव टाळू शकला नाही.





