Pro Kabaddi League 2024 : हरियाणा स्टीलर्स ठरला विजेता, Final मध्ये पाटणा पायरेट्सला चारली धूळ…

Pro Kabaddi League 2024 Final (Haryana Steelers vs Patna Pirates) :- प्रो कबड्डी लीगचा अकरावा हंगाम हरियाणा स्टीलर्सने जिंकला आहे. अशाप्रकारे हरियाणा स्टीलर्सने प्रथमच प्रो कबड्डी लीगचे विजेतेपद पटकावले आहे. हरियाणा स्टीलर्सने अंतिम फेरीत पाटणा पायरेट्सचा पराभव करून इतिहास रचला. वास्तविक, पटना पायरेट्सने आतापर्यंत विक्रमी 3 वेळा विजेतेपद पटकावले असले तरी चौथ्यांदा विजेतेपद मिळवण्याचे स्वप्न अधुरे राहिले.
After 1️⃣3️⃣7️⃣ matches, we have new ℂℍ𝔸𝕄ℙ𝕀𝕆ℕ𝕊 💙🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLFinal #HaryanaSteelers #PatnaPirates pic.twitter.com/z7CJjVkei1
— ProKabaddi (@ProKabaddi) December 29, 2024
याआधी गेल्या मोसमात हरियाणा स्टीलर्सचा अंतिम फेरीत पराभव झाला होता. त्यानंतर उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. मात्र यावेळी हरियाणा स्टीलर्सच्या खेळाडूंनी कोणतीही चूक केली नाही. हरियाणा स्टीलर्सने विजेतेपदाच्या दावेदार असलेल्या पाटणा पायरेट्स संघाचा पराभव केला. हरियाणा स्टीलर्सने पाटणा पायरेट्सचा 32-23 असा पराभव केला.
हरियाणाकडून यावेळी शिवम पाटारे हा मॅचविनर ठरला. कारण शिवमने फक्त चढाईतच गुण मिळवले नाही, तर त्याने चांगला पकडीही केल्या. शिवमने यावेळी चढाईत चार गुण कमावले, त्याचबरोबर त्याने पकडीमध्येही चार गुणांची कमाई केली. यावेळी शिवमने एक बोनस गुणही पटकावला. हरियाच्या संघाकडून यावेळी सर्वाधिक गुण शिवमच्या नावावर राहिले. शिवमने यावेळी 9 गुणांची कमाई केली.
Shivam Patare out-performed on the biggest stage and showcased some of the boldest moves 🔥
Presenting our Emerging Player of the Day 🤩#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PKLFinal #HaryanaSteelers pic.twitter.com/yzM237PlUe
— ProKabaddi (@ProKabaddi) December 29, 2024
हरियाणाने यावेळी चांगली चढाई तर केलीच, पण त्यांच्या विजयाचे खरे कारण ठरले ते बचाव. यावेळी चांगला बचाव हरियाणाच्या संघाने केला. हरियाणाच्या संघाने यावेळी 11 गुण चढाईत कमावले, तर पकडींमध्ये त्यांनी 15 गुणांची कमाई केली. यामध्ये हरियाणाने पाटणावर लोणही चढवला होता. त्यामुळे हरिणाला दोन गुणांची कमाई करता आली. त्याचबरोबर त्यांनी एक गुण बोनस कमावला. त्यामुळेच हरिणाला पाटणापेक्षा वरचढ यावेळी ठरता आले आणि जेतेपदाला गवसणी घातला आली. हरिणाच्या संघाकडे अव्वल बचाव होता, तो पाटण्याच्या संघाला भेदता आला नाही आणि तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाल्याचे पाहायला मिळाले.
पाटण्याच्या संघाकडून यावेळी मोठ्या अपेक्षा होत्या, पण त्यांना अंतिम फेरीत लौकिकाला साजेसा खेळ करता आला नाही. पाटणाच्या संघाने चढाईत 11 गुणांची कमाई केली, तर पकडींमध्येही त्यांनी 11 गुण कमावले. एक बोनस गुण त्यांनाही मिळाला. त्यामुळे त्यांचे 23 गुण होऊ शकले. पाटणाच्या संघाकडून गुरदीपने पकडींमध्ये पाच गुण कमावले आणि एक गुण त्याने बोनस मिळवला. पाटणाने या हंगामात चांगली कामगिरी केली होती, पण त्यांना उप विजेतेपदावरच समाधान मानावे लागले.





