Pro Kabaddi League 2024 : बेंगळुरू बुल्सची सलग पराभवांची मालिका खंडित, दबंग दिल्लीवर एका गुणानं विजय…

Pro Kabaddi League 2024 (Bengaluru Bulls vs Dabang Delhi KC) : प्रो कबड्डी लीगमध्ये बेंगळुरू बुल्सचा पराभवाचा सिलसिला अखेर खंडित झाला आहे. बुल्सने नेत्रदीपक पुनरागमन केले आणि मंगळवारी गचीबोवली इनडोअर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामातील 24 व्या सामन्यात दबंग दिल्ली केसीचा 34-33 असा पराभव केला. दिल्लीचा पाच सामन्यांमधील हा तिसरा पराभव आहे.
प्रो कबड्डी लीगमध्ये 24 वा सामना बेंगळुरू बुल्स आणि दबंग दिल्ली यांच्यात खेळला गेला. बेंगळुरू बुल्सने या सामन्यात चमकदार कामगिरी केली आणि प्रो कबड्डी लीग सीझन-11 मध्ये पाचव्या सामन्यानंतर पहिला विजय मिळवला. बंगळुरू बुल्सने या सामन्यात दबंग दिल्ली केसीचा अवघ्या 1 गुणांनी पराभव केला.
ದಬಂಗ್ ದೆಹಲಿಗೆ ಮಣ್ಣುಮುಕ್ಕಿಸಿದ ಬುಲ್ಸ್ 😍🥳
ಬೆಂಗಳೂರಿಗೆ ರೋಚಕ ಗೆಲವು ✌🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #DabangDelhiKC pic.twitter.com/PPBgdNdfhD
— ProKabaddi (@ProKabaddi) October 29, 2024
या सामन्यात दबंग दिल्लीचा रेडर आशु मलिकने सर्वाधिक 13 गुण तर बेंगळुरू बुल्सकडून जय भगवानने सर्वाधिक 11 गुण मिळवले. आशु मलिक आणि जय भगवान या दोघांनी सुपर-10 आणि नितीनने या सामन्यात हाय-फाइव्ह पूर्ण केले.
दरम्यान, प्रो कबड्डी लीगमध्ये याआधी 23 व्या सामन्यात बंगाल वॉरियर्स आणि पुणेरी पलटण आमने-सामने होते. हा अतिशय चुरशीचा झाला आणि शेवटी 32-32 असा बरोबरीत सुटला. एकेकाळी पुणेरी पलटण संघ खूप पुढे होता पण उत्तरार्धात बंगालचा रेडर सुशीलने चमकदार कामगिरी करत संघाला सामन्यात परत आणले.
Pro Kabaddi League 2024 : बंगाल वॉरियर्स-पुणेरी पलटण लढत बरोबरीत, फझल अत्राचलीचा मोठा विक्रम…
या सामन्यात सुशीलने सुपर-10 पूर्ण केले तर कर्णधार फजल अत्राचलीने 500 टॅकल पॉइंट्स पूर्ण करत मोठा विक्रम केला. पीकेएलमध्ये 500 टॅकल पॉइंट मिळवणारा तो पहिला बचावपटू ठरला. पुणेरी पलटणकडून आकाश शिंदे आणि पंकज मोहिते यांनी प्रत्येकी 8 गुण घेतले.





