Pro Kabaddi League 2024 : बंगाल वॉरियर्सने युपी योद्धाजचा विजयरथ रोखला, मनिंदर सिंगची दमदार कामगिरी….

Pro Kabaddi League 2024 (Bengal Warriorz vs UP Yoddhas) : – मनिंदर सिंगच्या दमदार चढाईच्या जोरावर बंगाल वॉरियर्सने युपी योद्धाजवर अतितटीच्या लढतीत 32-29 अशी केवळ 3 गुणांनी मात करताना 11 व्या प्रो कबड्डी लीगमध्ये शानदार विजय नोंदवला. बंगालचा या मोसमातील हा पहिला विजय आहे, तर यूपीला तीन सामन्यांत पहिला पराभव स्वीकारावा लागला आहे.
And breathe… Warriorz clinch their 1️⃣st win of #PKL11 in a nail-biter 🧘
Catch LIVE updates on https://t.co/cfORnVakqn or the Pro Kabaddi Official App 📱#ProKabaddi #ProKabaddiOnStar #LetsKabaddi #BengalWarriorz #UPYoddhas pic.twitter.com/hitTQV5Klc
— ProKabaddi (@ProKabaddi) October 24, 2024
दोन्ही संघांनी सुरुवातीपासूनच आक्रमक खेळाला सुरुवात केली. बंगालच्या मनिंदरने चढाईमध्ये 7 गडी व 1 बोनस अशी 8 गुणांची कमाई केली. सुशील कंबरेकरने 4 गडी, 1 बोनस व 2 पकडी केल्या. त्याला नितीन धनकरने 6 गडी व 1 बोनस घेताना सुरेख साथ दिली. फझल अत्राचलीने मोक्याच्या क्षणी 3 पकडी करताना आपली उपलब्धता सिद्ध केली. मध्यांतराला बंगाल संघाने 12-11 अशी एका गुणांची आघाडी घेतली होती.
युपी योद्धाज संघाकडून अष्टपैलू भारतने सुपर टेन मिळविताना 11 गडी व 2 बोनस असे 13 गुण मिळविले. भवानी राजपूतने 1 गडी व 3 बोनस मिळविताना 4 गुणांची कमाई केली. सुमीतने 3 पकडी केल्या. मात्र तीनही खेळाडूंनी चांगला खेळ करून देखील ते संघाचा पराभव वाचवू शकले नाहीत.
Pro Kabaddi League 2024 : तमिळ थलैवाजाने रोखली पुणेरी पलटणची विजयी घोडदौड…
युपी योद्धाजने आतापर्यंत 3 पैकी 2 लढती जिंकल्या असून 11 गुणांसह ते अव्वल स्थानावर आहेत. बंगाल वॉरियर्सने 2 पैकी एका लढतीत विजय तर एका लढतीत पराभव स्वीकारला असून 6 गुणांसह ते सातव्या स्थानी आहेत.





