Pro Kabaddi League 2024 : बेंगळुरू बुल्सची ‘हाराकिरी’ कायम; बंगाल वॉरियर्सचा दमदार विजय..

Pro Kabaddi League 2024 (Bengaluru Bulls Vs Bengal Warriorz) : प्रो कबड्डी लीगच्या 44 व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सने बेंगळुरू बुल्सचा 40-29 असा पराभव केला. 7 सामन्यांनंतरचा हा तिसरा विजय असून गुणतालिकेत ते 5व्या स्थानावर आले आहेत. बुल्सचा हा सहावा पराभव असून ते अजूनही 11व्या स्थानावर आहेत.
The Warriorz roar past the Bulls to end the Hyderabad leg on a high 🐯
#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #BengalWarriorz pic.twitter.com/nvjAbGooae— ProKabaddi (@ProKabaddi) November 9, 2024
दरम्यान, त्याआधीच्या सामन्यात रोमहर्षक लढतीत तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटणचा 34-33 असा पराभव केला. अटीतटीच्या लढतीमध्ये तेलगू टायटन्स संघाने पुणेरी पलटण संघाला केवळ 1 गुणाने पराभूत करताना प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामात आपली आगेकूच कायम राखली.
Pro Kabaddi 2024 : तेलगू टायटन्सचा रोमहर्षक विजय, पुणेरी पलटणला 1 गुणानं केलं पराभूत…
या सामन्यात कर्णधार पवन सेहरावत आणि विजय मलिक तेलुगू टायटन्सच्या विजयाचे हिरो ठरले. तेलगू संघाच्या विजय मलिकने 13 तर पवन सेहरावतने 12 गुणांची कमाई केली. पलटणच्या पंकज मोहितेने 9 गुणांची कमाई करताना चांगली लढत दिली.





