Pro Kabaddi 2024 : बेंगळुरू बुल्सचा पटना पायरेट्सविरुद्ध दारूण पराभव….

Pro Kabaddi 2024 (Bengaluru Bulls vs Patna Pirates) : प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामात, मंगळवारी 19 नोव्हेंबर रोजी एकूण दोन सामने खेळले गेले. पुणेरी पलटण आणि यूपी योद्धा यांच्यातील पहिला सामना 29-29 असा बरोबरीत सुटला. तर बेंगळुरू बुल्सला पाटणा पायरेट्सविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले.
Pirate conquest ✅#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengaluruBulls #PatnaPirates pic.twitter.com/9RBVtSFcRR
— ProKabaddi (@ProKabaddi) November 19, 2024
प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमातील 64 व्या सामन्यात, तीन वेळा चॅम्पियन पटना पायरेट्सने बेंगळुरू बुल्सचा 54-31 असा पराभव केला. पाटणा पायरेट्सकडून देवांकने पुन्हा एकदा शानदार खेळ करत 16 गुण मिळवले. संदीप आणि अयाननेही त्याला रेडिंगमध्ये चांगली साथ दिली. अयानने 12 गुण घेतले.
या सामन्यांनंतर गुणतालिकेत मोठा बदल झाला आहे. पुणेरी पलटणचा संघ आता चौथ्या क्रमांकावर घसरला असून बेंगळुरू बुल्सविरुद्धच्या विजयानंतर पाटणा पायरेट्स संघ तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. तर बेंगळुरू बुल्स 11व्या स्थानी आणि यूपी योद्धा संघ 9व्या स्थानावर राहील.





