Pro Kabaddi 2024 (Puneri Paltan vs UP Yoddhas) – प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 63वा सामना पुणेरी पलटण आणि यूपी योद्धा यांच्यात खेळला गेला. ही लढत 29-29 अशी बरोबरीत राहिली. पुणेरी पलटणने या सामन्यात मोहित गोयतला खेळवले नाही पण पंकज मोहितेने चढाईत आणि मोहितने बचावात चांगली कामगिरी केली.
A pure edge-of-the-seat thriller 🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #UPYoddhas pic.twitter.com/hmu5BfSmgm
— ProKabaddi (@ProKabaddi) November 19, 2024
पहिल्या 10 मिनिटांत दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली. पुणेरी पलटणने सुरुवातीला आघाडी घेतली होती पण हळूहळू यूपी योद्धा संघानेही पुनरागमन केले. पहिल्या सत्रात युपी योद्धाजने 16-14 अशी 2 गुणांची आघाडी घेतली होती. दोन्ही संघाचे रेडर आणि बचावपटू चांगली कामगिरी करत होते.
Pro Kabaddi 2024 : बेंगळुरू बुल्सचा एका गुणानं पराभव, अतितटीच्या लढतीत यू-मुम्बानं मारली बाजी…
पहिल्या सत्रात युपी योद्धाज संघाने चढाई व पकडीतून प्रत्येकी 6 गुणांची कमाई केली. पुणेरी पलटण संघाने चढाईतून 7 व पकडीतून 6 गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात पुणेरी पलटणने 15 गुणांची कमाई करताना लढत बरोबरीत सोडविली. युपी योद्धाजकडून भवानी राजपूतने 10 गुणांची कमाई करताना सुपर 10 पूर्ण केले. पुणेरी पलटण संघाकडून पंकज मोहितेने 9 गुणांची कमाई केली.