Pro Kabaddi 2024 : तेलगू टायटन्सचा रोमहर्षक विजय, पुणेरी पलटणला 1 गुणानं केलं पराभूत…

Pro Kabaddi 2024 (Telugu Titans Vs Puneri Paltan) :- तेलुगू टायटन्सने त्यांच्या घरच्या मैदानावरील(home leg) शेवटच्या सामन्यात रोमहर्षक विजय खेचून आणला आणि विजयासह घरच्या चाहत्यांना निरोप दिला. रोमहर्षक लढतीत तेलुगू टायटन्सने पुणेरी पलटणचा 34-33 असा पराभव केला. अटीतटीच्या लढतीमध्ये तेलगू टायटन्स संघाने पुणेरी पलटण संघाला केवळ 1 गुणाने पराभूत करताना प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या हंगामात आपली आगेकूच कायम राखली.
అద్గదీ టైటన్స్ ఫుల్ ఆన్ ఫైర్ 🔥🔥🔥
లాస్ట్ సీజన్స్ వరకు ఒక లెక్క!! 🫡
ఈ సీజన్ ఇంకో లెక్క 😎వరుసగా 4వ విజయం సాధించారు 🥳
మరి బిర్యానీ కానిచ్చేద్దామా? 😋#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TeluguTitans #PuneriPaltan pic.twitter.com/Leug5dtQ38— ProKabaddi (@ProKabaddi) November 9, 2024
या सामन्यात कर्णधार पवन सेहरावत आणि विजय मलिक तेलुगू टायटन्सच्या विजयाचे हिरो ठरले. तेलगू संघाच्या विजय मलिकने 13 तर पवन सेहरावतने 12 गुणांची कमाई केली. पलटणच्या पंकज मोहितेने 9 गुणांची कमाई करताना चांगली लढत दिली.
Pro Kabaddi 2024 : आशु मलिकची दमदार कामगिरी, दिल्लीचा बंगालवर दबंग विजय…
मध्यंतराला दोन्ही संघानी 20-20 अशी बरोबरी केली होती. यामध्ये तेलगू संघाने चढाईतून 13 तर पकडीतून 4 तर पुणेरी पलटण संघाने चढाईतून 12 व पकडीतून 6 गुणांची कमाई केली. दुसऱ्या सत्रात तेलगू संघाने 14 तर पुणेरी पलटण संघाने 13 गुण मिळविले.





