Pro Kabaddi 2024 (Bengal Warriorz vs Dabang Delhi KC) – प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 39व्या सामन्यात दबंग दिल्ली केसीने बंगाल वॉरियर्सचा 33-30 असा पराभव केला. सलग 4 सामने गमावल्यानंतर दिल्लीचा हा पहिला विजय तर बंगालचा 4 सामन्यांनंतरचा पहिला पराभव आहे.
दिल्ली के दबंग छोरों ने लगाई जीत की दहाड़ 🔥💙#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #DabangDelhiKC pic.twitter.com/UQ1qpSdyUk
— ProKabaddi (@ProKabaddi) November 7, 2024
गुरुवारी झालेल्या लढतीमध्ये आशु मलिकने सुपर 10 पूर्ण केले. त्याला विनयने 8 तर आशिषने 6 गुण मिळविताना सुरेख साथ दिली. बंगाल संघाकडून रेडर नितीन कुमारने 15 गुणांची कमाई करताना चांगली लढत दिली.
मध्यंतराला दबंग दिल्ली संघाने 19-13 अशी आघाडी घेतली होती. दुसऱ्या सत्रात देखील दिल्लीच्या खेळाडूंनी बंगाल वॉरियर्सवर वर्चस्व राखले. बंगालची बचाव फळीची कामगिरी खूपच खराब होती आणि त्यांना दिल्लीच्या रेडर्सवर कोणताही दबाव टाकता आला नाही.
Pro Kabaddi 2024 : अजितची चमकदार कामगिरी; U-Mumbaचा पटना Patna Piratesवर शानदार विजय…
अखेरीस बंगाल वॉरियर्सने पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीला रोखण्यात त्यांना अजिबात यश आले नाही. दबंग दिल्ली केसीने हा प्रो कबड्डी लीग सामना शानदारपणे जिंकला आणि 5 महत्त्वाचे गुण मिळवले. बंगाल वॉरियर्सला केवळ एका गुणावर समाधान मानावे लागले.