Pro Kabaddi 2024 (Puneri Paltan vs Gujarat Giants) :- पुणेरी पलटण संघाने गुजरात जायंट्सला ४९-३० असे १९ गुणांनी पराभूत करताना ११ व्या प्रो कबड्डी लीगमध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. याआधी रविवारी झालेल्या लढतीमध्ये पुणेरी पलटण संघाने यु मुम्बाला ३५-२८ असे पराभूत केले होते.
सह्याद्रीच्या खोऱ्यातल्या जिगरबाज मावळ्यांनी यंदाच्या सीझनवर वर्चस्व गाजवलेय. सीझनचा पाचवा विजय खात्यावर! 🥳
पुण्याचं पाणी वेगळंच आहे हे नक्की 🎊#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #PuneriPaltan #GujaratGiants pic.twitter.com/n7GFaVfn5s
— ProKabaddi (@ProKabaddi) November 4, 2024
हैदराबाद येथील गचीबोवली येथील मैदानावर झालेल्या लढतीमध्ये मध्यंतरालाच पुणेरी पलटण संघाने ३०-९ अशी २१ गुणांची आघाडी घेतली होती. आकाश शिंदेने ११ गुणांसह आपले ‘सुपर १०’ पूर्ण केले. त्याला पंकज मोहितेने ८ गुणांसह सुरेख साथ दिली. गुजरात जायंट्स संघाकडून गुमान सिंगने १२ गुण मिळविताना सुपर १० पूर्ण केले. मात्र तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही.
तत्पूर्वी रविवारी उशीरा झालेल्या लढतीमध्ये बंगाल वॉरियर्सने हरियाणा स्टीलर्स संघाला अटीतटीच्या लढतीत ४०-३८ असे २ गुणांनी पराभूत केले. मध्यंतराला दोन्ही संघांनी १९-१९ अशी बरोबरी केली होती. बंगाल संघाकडून मणिंदरने (१२) तर हरियाणा संघाकडून विनयने सुपर ‘१०’ पूर्ण केले.
Pro Kabaddi 2024 : पुणेरी पलटणचा यू मुंबावर धमाकेदार विजय, गुणतालिकेतही गाठलं अव्वल स्थान…
मणिंदरला मयूर कदम, प्रवीण ठाकूर व सुशील कांब्रेकर व फझल अत्राचलीने प्रत्येकी ४ गुण मिळविताना सुरेख साथ दिली. हरियाणा स्टीलर्सकडून मोहम्मदरेझा शदलोईने ९ तर नवदीपने ६ गुणांची कमाई केली.