Pro Kabaddi 2024 (PKL 11) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 32 व्या सामन्यात तर आपल्या सहाव्या सामन्यात पुणेरी पलटणने यू मुंबाला पराभूत केले आहे. कर्णधार अस्लम इनामदारच्या शानदार सुपर 10 आणि गौरव खत्रीच्या हाई फाइव्हच्या जोरावर संघाने मुंबाचा 35-28 असा पराभव केला. यासह पुणेरी पलटण संघ आता गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे.
पुणेरी पलटणच्या या सामन्यात कर्णधार अस्लम इनामदारने सुपर-10 आणि मोहित गोयतने 9 गुण घेतले. तर गौरव खत्रीने बचावात कहर केला.त्याने एकट्याने सात गुण घेतले. यू-मुंबाकडून अजित चव्हाणने सर्वाधिक रेड पॉइंट घेतले. त्याने एकूण 9 गुण घेतले. मात्र, संघाचा बचाव फसला आणि त्यामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले.
रविवारी झालेल्या दोन सामन्यांनंतर गुणतालिकेत झालेल्या बदलांबद्दल बोलायचे झाले तर पुणेरी पलटण आता पहिल्या क्रमांकावर आला आहे. तर पराभूत झाल्यानंतर यू मुंबाचा संघ अजूनही 9व्या स्थानावर आहे. याशिवाय पहिल्या सामन्यातील विजेता बंगाल वॉरियर्स 10व्या स्थानावरून चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. तर हरियाणा स्टीलर्स पाचव्या स्थानावर आहे.
प्रो कबड्डी लीग 2024 गुणतालिका खालीलप्रमाणे…
1) पुणेरी पलटण – 6 सामन्यांनंतर 24 गुण
2) तमिळ थलायवास – 5 सामन्यांनंतर 19 गुण
3) UP योद्धा – 6 सामन्यांनंतर 18 गुण
4) बंगाल वॉरियर्स – 5 सामन्यांनंतर 17 गुण
5) हरियाणा स्टीलर्स – 5 सामन्यांनंतर 16 गुण
6) पाटणा पायरेट्स – 5 सामन्यांनंतर 16 गुण
7) तेलुगू टायटन्स – 6 सामन्यांनंतर 16 गुण
8) जयपूर पिंक पँथर्स – 5 सामन्यांनंतर 14 गुण
9) यू मुंबा – 5 सामन्यांनंतर 14 गुण
10) दबंग दिल्ली KC – 6 सामन्यांनंतर 13 गुण