Pro Kabaddi 2024 (Tamil Thalaivas vs Patna Pirates) :- शेवटपर्यंत अटीतटीने झालेल्या सामन्यात तमिळ थलैवाज संघाने पाटणा पायरेट्स संघाला चिवट लढत दिली. मात्र पाटणा संघाने हा सामना 42-38 असा 4 गुणांनी जिंकला स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. तर दुसरीकडे प्रो कबड्डी लीगच्या 11व्या मोसमात तमिळ थलैवाजचा प्लेऑफचा मार्ग खूपच कठीण झाला आहे. आता थलैवाजने त्याचे उर्वरित सर्व सामने जिंकले तरीही ते प्लेऑफमध्ये जाऊ शकणार नाहीत.
Pirates jump to the 2️⃣nd spot with that thunderous win ⚡💚#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #TamilThalaivas #PatnaPirates pic.twitter.com/CRKOSTVMOm
— ProKabaddi (@ProKabaddi) December 13, 2024
या सामन्यात मोईन शफाघीने 11 गुण आणि सचिन तन्वरनेही संघासाठी 8 गुण मिळवले, परंतु खराब बचावामुळे संघाला पराभवाला सामोरे जावे लागले. तर पाटणा पायरेट्ससाठी देवांकने 12 आणि अयानने 13 गुण मिळवत संघाला एकतर्फी विजय मिळवून दिला. शुभम शिंदेनेही हाय फाईव्ह पूर्ण केलं.
पाटणा संघाने सुरुवातीपासूनच आघाडी मिळवतानाच अकराव्या मिनिटालाच पहिला लोण चढविला. त्यावेळी त्यांनी 16-8 अशी आघाडी घेतली. तमिळ संघाने पिछाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये त्यांना यश आले नाही. मध्यंतराला पाटणा संघाकडे 20-15 अशी पाच गुणांची आघाडी होती.
Pro Kabaddi 2024 (Match 108) | यूपी वॉरियर्स विरूध्द बंगाल वॉरियर्स लढत बरोबरीत….
उत्तरार्धातही पाटणा संघाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळ करत आपली आघाडी दहा गुणांपर्यंत वाढविली. शेवटच्या 10 मिनिटे बाकी असताना पाटणा संघ 29-25 असा आघाडीवर होता. मात्र, 33 व्या मिनिटाला तमिळ संघाने लोण चढवीत सामन्यातील उत्कंठा वाढविली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना पाटणा संघ 36-33 असा आघाडीवर होता. पाटणा संघाकडून देवांक, अयान व शुभम शिंदे तर तमिळ संघाकडून मोईन शफागी, हिमांशू व सचिन यांनी चमकदार कामगिरी केली.