Pro Kabaddi 2024 : – नीरज नरवालने केलेल्या जबरदस्त चढायांच्या जोरावर पिंक पँथर्स संघाने युपी योद्धाज संघाला ३३-३० असे ३ गुणांनी पराभूत करताना प्रो कबड्डी लीगच्या ११ हंगामात विजयाची नोंद केली.
येथील गचीबोवली येथील इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या लढतीत दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केला. मध्यंतराला युपी योद्धाज संघाने १७-१५ अशी २ गुणांची आघाडी घेतली होती. युपी योद्धाज संघाने चढाईतून ९ तर पकडीतून ७ गुण मिळविले. पिंक पँथर्सने पहिल्या सत्रात चढाईतून ७ तर पकडीतून ६ गुण मिळविले. दुसऱ्या सत्रात मात्र पिंक पँथर्स संघाने जोरदार पुनरागमन केले. दुसऱ्या सत्रात पिंक पँथर्सने युपी योद्धाजवर लोन चढविताना ४ गुणांची अधिकची कमाई केली. पकडीतून ८ तर चढाईतून ६ गुणांची कमाई केली. मात्र युपी योद्धाज संघाला दुसऱ्या सत्रात पकडीतून ७ तर चढाईतून सहाच गुण मिळविता आले.
पैंथर्स के खतरनाक पंजों ने योद्धाज़ को किया घायल 🥵#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #JaipurPinkPanthers #UPYoddhas pic.twitter.com/1tSi0KwIlV
— ProKabaddi (@ProKabaddi) November 5, 2024
पिंक पँथर्सकडून नीरज नरवालने धडाकेबाज रेड करताना ९ गुणांची कमाई केली मात्र त्याला सुपर १० पूर्ण करता आले नाही. त्याला रेडर अर्जुन देशवालने चढाईतून ५ गुण तर सुरजीत सिंग व रजा मीरबाघेरी यांनी अनुक्रमे ४ व ५ गुण मिळविताना सुरेख साथ दिली. युपी योद्धाजकडून अष्टपैलू भारतने ७ तर हितेश व सुमीत यांनी पकडीतून प्रत्येकी ५ गुण संघाला मिळवून दिले.
बेंगळुरू बुल्सने थलैवाज संघाला केले पराभूत…
तत्पूर्वी, झालेल्या लढतीमध्ये बेंगळुरू बुल्स संघाने तमिळ थलैवाज संघाला ३६-३२ असे केवळ ४ गुणांच्या फरकाने पराभूत केले. अटीतटीच्या लढतीमध्ये मध्यंतराला बेंगळुरू बुल्स संघाने १४-१३ अशी केवळ १ गुणांची आघाडी घेतली होती. पहिल्या सत्रात बेंगळुरू बुल्सने चढाईतून ६ गुणांची तर पकडीतून ७ गुणांची कमाई केली. यावेळी तमिळ थलैवाज संघाने पकडीतून ८ गुणांची कमाई केली तर चढाईतून त्यांना केवळ ३ गुण मिळविता आले. दुसऱ्या सत्रात बेंगळुरू बुल्स संघाने अजून जोरदार आक्रमण करताना चढाईतून १० तर पकडीतून ९ गुणांची कमाई केली. यावेळी मात्र तमिळ थलैवाज संघाने चढाईतून १० गुण मिळविताना बुल्सची बरोबरी केली. मात्र त्यांना पकडीतून केवळ ७ गुणच मिळविता आले.
बुल्सकडून रेडर अजिंक्य पवार व बदली खेळाडू अक्षित यांनी प्रत्येकी ६ गुण वसूल केले. त्याला सुरिंदर दहेलने ५ पकडी करताना सुरेख साथ दिली. थलैवाज संघाकडून रेडर नरिंदर कांडोलाने ६ तर सचिनने ५ गुण मिळविले. अमीर हुसेन व साहिल गलिया यांनी प्रत्येकी ४ गुण पकडीतून मिळविले.