Pro Kabaddi 2024 (Match 118) | बेंगळुरू बुल्सची लाजिरवाणी कामगिरी कायम…

Pro Kabaddi 2024 (Jaipur Pink Panthers Vs Bengaluru Bulls) | प्रो कबड्डी लीग 2024 च्या 118 व्या सामन्यात जयपूर पिंक पँथर्सने बेंगळुरू बुल्सचा 35-26 असा पराभव केला. यासह जयपूर 64 गुणांसह 5 व्या स्थानावर पोहचला आहे तर दुसरीकडे बेंगळुरू बुल्स अजूनही शेवटच्या स्थानावर आहे. त्याचा हा हंगामातील 17 वा पराभव होता.
3️⃣rd consecutive win and the Panthers move into the Top 6️⃣🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #JaipurPinkPanthers #BengaluruBulls pic.twitter.com/povrVsxHiB
— ProKabaddi (@ProKabaddi) December 17, 2024
प्रो कबड्डी लीग 2024 च्या या सामन्यात, अर्जुन देशवालने जयपूर पिंक पँथर्ससाठी रेडिंगमध्ये सर्वाधिक 17 रेड पॉइंट घेतले आणि अंकुशने डिफेंसमध्ये 4 टॅकल पॉइंट घेतले.
बेंगळुरू बुल्ससाठी, अजिंक्य पवारने रेडिंगमध्ये सर्वाधिक 6 रेड पॉइंट घेतले आणि अरुलनंथाबूने डिफेंसमध्ये (बचाव) 5 टॅकल पॉइंट घेतले. परदीप नरवालची कामगिरी काही विशेष नव्हती आणि त्याला केवळ 5 गुण मिळवता आले. बोनस मिळवताना प्रदीप नरवालने प्रो कबड्डी लीग 2024 मध्ये 100 रेड पॉइंट्स पूर्ण केले.





