Pro Kabaddi 2024 (Match 115) |बंगाल वॉरियर्सचा दारूण पराभव, दबंग दिल्लीचा विजयासह प्लेऑफमध्ये प्रवेश…

Pro Kabaddi League 2024 (Dabang Delhi K.C. vs Bengal Warriorz) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील प्लेऑफमध्ये पोहोचणाऱ्या दुसऱ्या संघाचे नाव समोर आले आहे. दबंग दिल्ली केसीने अंतिम 6 मध्ये आपले स्थान पक्के केले आहे. हरियाणा स्टीलर्सनंतर पुढील फेरीत (प्लेऑफ) जाणारा तो दुसरा संघ ठरला आहे. यासह दिल्लीने इतिहास रचला आहे.
दबंग दिल्ली केसीने प्रो कबड्डी लीग 2024 च्या 115 व्या सामन्यात बंगाल वॉरियर्सचा पराभव केला आणि यासह ते अधिकृतपणे प्लेऑफमध्ये पोहोचले. 20 सामन्यांत 11 विजयासह त्यांचे 71 गुण आहेत. आता पुढील दोन सामने जिंकून टॉप 2 मध्ये आपले स्थान पक्के करून थेट उपांत्य फेरी गाठण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.
दबंग छोरों ने वॉरियर्स को चटाई धूल 🤯
धमाकेदार जीत के साथ प्लेऑफ में जगह बनाने वाली बनी दूसरी टीम 💙🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #DabangDelhiKC #BengalWarriorz pic.twitter.com/ujeau9QhF4
— ProKabaddi (@ProKabaddi) December 16, 2024
सलग सहाव्यांदा केली ‘ही’ कामगिरी…
सलग सहाव्या मोसमात दबंग दिल्ली केसीने पीकेएल प्लेऑफमध्ये स्थान मिळवले आहे आणि त्यांच्या व्यतिरिक्त, गेल्या 6 हंगामात कोणालाही ही कामगिरी करता आलेली नाही. सहाव्या हंगामात ते प्रथमच प्लेऑफसाठी पात्र ठरले होते, सातव्या हंगामात ते उपविजेता ठरले तर आठव्या सत्रात त्यांनी ट्रॉफी जिंकली होती. 9व्या आणि 10व्या मोसमातही ते प्लेऑफमध्ये पोहोचले, पण त्यांना विजेतेपद मिळवता आले नाही.
दबंग दिल्ली केसीने पुण्यात झालेल्या बंगाल वॉरियर्सविरुद्धच्या सामन्यात सोमवारी जबरदस्त कामगिरी केली. 47-25 असा विजय मिळवून त्यांनी केवळ प्लेऑफमध्येच स्थान मिळवले नाही तर प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामात बंगालचा प्रवासही संपवला. गेल्या 13 सामन्यांमध्ये दिल्लीचा पराभव झालेला नाही.
Pro Kabaddi 2024 (Match 113) | तमिळ थलैवाजचे आव्हान जवळपास संपुष्टात….
या सामन्यात दिल्लीचा कर्णधार आशु मलिक आणि उजव्या कोपऱ्यातील योगेश दहिया यांची तुफानी कामगिरी पाहायला मिळाली. आशु मलिकने सुपर 10 स्कोअर करताना 16 रेड पॉईंट्स आणि योगेशने हाय 5 स्कोअर करताना 9 टॅकल पॉइंट्स मिळवले. बंगाल वॉरियर्ससाठी, नितीश कुमारने हाय 5 स्कोअर करताना 5 टॅकल पॉइंट घेतले आणि एस विश्वासने 8 रेड पॉइंट घेतले. फाझेल अत्राचलीनेही तीन टॅकल पॉइंट घेतले.





