Pro Kabaddi 2024 (Match 105) | हरियाणा स्टीलर्सने शानदार विजयासह प्लेऑफमध्ये केला प्रवेश…

Pro Kabaddi League 2024 (Haryana Steelers vs Bengaluru Bulls) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 105 वा सामना हरियाणा स्टीलर्स आणि बेंगलुरु बुल्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात हरियाणा स्टीलर्सने बेंगळुरू बुल्सचा 37-26 असा पराभव केला.
स्टीलर्स ने धमाकेदार जीत के साथ प्लेऑफ में बनाई जगह 💪🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #HaryanaSteelers #BengaluruBulls pic.twitter.com/PHcl6a9ERP
— ProKabaddi (@ProKabaddi) December 11, 2024
यासह हरियाणा स्टीलर्स प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या मोसमात प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. या मोसमात प्लेऑफमध्ये पोहोचणारा हा पहिलाच संघ ठरला आहे. या सामन्यादरम्यान एक मोठा विक्रमही झाला. या हंगामात प्रो कबड्डी लीगमध्ये एकूण 4000 रेड पॉइंट पूर्ण झाले आहेत.
हरियाणा स्टीलर्सच्या या सामन्यात विनयने रेडिंगमध्ये (चढाई) चमकदार कामगिरी करत 9 गुण मिळवले. डिफेंसमध्ये (बचाव) मोहम्मदरेझा शादलूने 6 आणि राहुल सेतपालने 4 गुण घेतले.
तर दुसरीकडे बेंगळुरू बुल्ससाठी त्यांचा अनुभवी रेडर परदीप नरवाल फ्लॉप ठरला. या सामन्यात त्याला केवळ एकच गुण घेता आला. परदीपशिवाय जतीनही रेडिंगमध्ये फ्लॉप ठरला. संघासाठी नितीन रावलने डिफेंसमध्ये 4 गुण तर सौरभ नंदलने 3 गुण घेतले मात्र ते संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही.





