Pro Kabaddi 2024 (Match 104) | नरवालची स्फोटक कामगिरी व्यर्थ, बंगाल वॉरियर्सकडून बेंगळुरू बुल्सचा दारुण पराभव…

Pro Kabaddi League 2024 (Bengal Warriorz vs Bengaluru Bulls) : प्रो कबड्डी लीगच्या 11व्या हंगामातील 104 वा सामना बेंगळुरू बुल्स आणि बंगाल वॉरियर्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात प्रदीप नरवालच्या बेंगळुरू बुल्सला आणखी एका पराभवाला सामोरे जावे लागले आहे. बंगाल वॉरियर्सने त्यांचा 44-29 असा पराभव केला.
Warriorz keep their Playoffs hopes alive with a win over Bulls 🔥#ProKabaddi #PKL11 #LetsKabaddi #ProKabaddiOnStar #BengalWarriorz #BengaluruBulls pic.twitter.com/HkFrr6BpY9
— ProKabaddi (@ProKabaddi) December 10, 2024
या सामन्यात प्रदीप नरवालने चांगली कामगिरी करत 14 गुण मिळवले मात्र त्याला इतर खेळाडूंची साथ मिळाली नाही, त्यामुळे बेंगळुरू बुल्सला पराभवाचा सामना करावा लागला. बंगाल वॉरियर्सकडून एस विश्वासने 14 आणि प्रणय राणेने 9 गुण घेतले. तर बचावफळीनेही या मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली. कर्णधार फजल अत्राचली आणि नितेश कुमार या दोघांनी प्रत्येकी 7 गुण घेतले. त्यामुळे बंगाल वॉरियर्सने हा सामना सहज जिंकला.
या विजयामुळे बंगाल वॉरियर्सने प्लेऑफच्या शर्यतीतही स्वतःला कायम ठेवले आहे. बंगाल वॉरियर्स हा 17 सामन्यातील 5 वा विजय आहे. यासह ते 37 गुणांसह गुणतालिकेत 10 व्या क्रमाकांवर आहेत. तर दुसरीकडे बेंगळुरू बुल्स 17 सामन्यातील 14 व्या पराभवासह आणि 19 गुणासह गुणतालिकेत शेवटच्या स्थानी आहे. त्यामुळे ते प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यात जमा आहेत.





